Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Crop Loss Issue : रविवारी मोताळा, नांदुरा, मलकापूर तालुक्यांत ढग फुटावा असा पाऊस कोसळला. या पावसाने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न पार धुळीस मिळवले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Buldana News : तीन दिवसांपूर्वी झालेल्या दसऱ्याचा शेतकऱ्यांसाठी क्षणिक ठरला. दसऱ्याचा दुसरा दिवस इतका यातनादायी उगवेल असे कुणालाही वाटत नव्हते. रविवारी मोताळा, नांदुरा, मलकापूर तालुक्यांत ढग फुटावा असा पाऊस कोसळला. या पावसाने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न पार धुळीस मिळवले.

प्रामुख्याने नदी-नाल्याच्या काठालगतच्या जमिनी खरडून गेल्या. एक दिवसापूर्वीच टवटवीत दिसणारी पिके जमीनदोस्त झाली. या आपत्तीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. १९६५ नंतर पहिल्यांदाच इतका तुफान पाऊस आम्ही पाहिल्याची वयोवृद्धांनी आपबिती सांगितली. काही ठिकाणी अनेकांनी रात्र जागवली. प्रशासनाने दीड लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल पाठवला आहे.

Crop Damage
Heavy Rain : मलकापूरमध्ये अतिवृष्टी

पाऊस आणि पूर ओसरला, तरी या नुकसानीच्या खुणा जागोजागी पाहायला मिळाल्या. मंगळवारी (ता. १५) नांदुरा, मलकापूर तालुक्यांत विविध ठिकाणी भेट दिली तेव्हा विदारक स्थिती दिसून आली. या भागात तीन दिवस सतत पाऊस झाला. मात्र रविवारची रात्र काळरात्र ठरली. तीन ते साडेतीन तास संततधार पाऊस एकसारखा सुरू होता.

मोताळा तालुक्यात तीन दिवसांत सुमारे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मलकापूर तालुक्यात २४ तासांत सरासरी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. जांभूळधाबा मंडलात १६६ मिलिमीटर असा विक्री पाऊस पडला. या पावसामुळे या तीनही तालुक्यातील सर्वच प्रकल्प ओसंडून वाहले. कंडारी गावाशेजारी कमळजा नदीवरील प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका भीतीदायक होता की धरण फुटते की काय, या चिंतेने अनेकांनी ती रात्र जागून काढली.

Crop Damage
Heavy Rain Warning : आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधारा; चेन्नईसह चार जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद

पुढे हेच पाणी खैरा, कोकलवाडी अशा गावांमधून नदीपात्रातून वाहले. वेचणीसाठी आलेला कापूस झाडावरच लटकला. सततच्या पावसाने कापसाच्या बोंडातून, सोयाबीनच्या शेंगातून कोंब बाहेर येऊ लागले आहेत. शेतात काही शेतकऱ्याने सुड्या लावून ताडपत्रीने झाकून ठेवल्या होत्या. या सुड्या पुराच्या पाण्यात तरंगत वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दीपक भगत यांच्या शेतातील विहीर जमिनीत गेली.

साडेतीन लाख खर्च करून विहीर खोदली होती. पुरुषोत्तम भगत यांचे नदीकाठालगतचे शेतच वाहिले. शोभाबाई राजपूत, अनिलसिंग राजपूत यांचे मोठे नुकसान आहे. वादळामुळे कंडारी गावात बाळकृष्ण पाटील यांच्या सीताफळ बागेत झाडावरील फळे जमिनीवर तुटलेली दिसून आली. खैरा शिवारात पाऊस ओसरून दोन दिवस उलटले तरी कपाशीच्या पिकात साचलेले पाणी कमी झालेले नव्हते. काही शेतकऱ्यांनी डिझेल पंप लावून पाणी काढण्याची कसरत चालवली होती.

मी १९६५ ला इतका पाऊस पाहला होता. त्यानंतर पहिल्यांदाच परवाचा पाऊस अनुभवला. या पावसाने माझ्या सहा एकरांतील पिकाचे नुकसान झाले. काही शेत खरडले. गावातील अनेकांची शेती कमळजा नदीच्या पुराने पिकासह खरडून गेली. कुणाचे पाइप, कुणाचे कृषिपंप वाहले. शेतातील विहिरी जमीनदोस्त झाल्या.
श्‍यामराव भगत, शेतकरी, कोकलवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com