Government Warehouse  Agrowon
ॲग्रो विशेष

Rotting Grain : रोह्यात सरकारी गोदामातील ६०० टन धान्य सडले

Government Warehouse : सरकारी गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यात जिल्हा पुरवठा विभागाला मंगळवारी सायंकाळी उशिरा यश आले असले तरी महिनाभरापासून गोदामात पडलेले सुमारे ६०० टन धान्य सडले आहे.

Team Agrowon

Raigad News : सरकारी गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यात जिल्हा पुरवठा विभागाला मंगळवारी सायंकाळी उशिरा यश आले असले तरी महिनाभरापासून गोदामात पडलेले सुमारे ६०० टन धान्य सडले आहे.

माथाडी कामगार संपावर गेल्याने गोदामाबाहेर चार ट्रक महिनाभरापासून उभे असून त्यातील धान्याच्या गोण्या उतरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे धान्याला कुबट वास येत असून तेही खराब होण्याच्या मार्गावर आहे. धान्याचे वितरण न झाल्यामुळे अनेक गावांतील रेशनिंग दुकानांत धान्य पोहोचू न शकल्‍याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यातील २१ शासकीय धान्य गोदामांमध्ये सात हमाल संस्थांना कंत्राट दिले आहे. या कंत्राटांची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर हमाल संस्थांना वेळोवेळी तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. रोह्यातील हमालांनी प्रलंबित हमाली देयके, माथाडी मंडळाने निश्चित केलेल्या सुधारित दरांची (खंड ३३ अंतर्गत) अंमलबजावणी करणे, मुदतवाढीऐवजी नव्याने निविदा प्रक्रिया करणे, आदी मागण्यांसाठी १७ जानेवारीपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.

माथाडी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले. कामगारांनी संप मागे घेतला असला तरी या संपाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील रेशनिंग धान्य दुकानांवर झाला आहे. धान्य पुरवठा होत नसल्याने दुकानांना टाळे लागले आहे.

त्यामुळे गोरगरीब कुटुंबांना खासगी दुकानांमध्ये महाग दराने धान्य खरेदी करावे लागते. रोह्याच्या सरकारी गोदामात सहाशे टन धान्य पडून आहे. कळंबोली, तळोजा येथून आलेल्या धान्य वाहनांमध्ये शंभर टन धान्य भरलेले आहे. हमाल नसल्याने महिनाभरापासून गाड्या गोदामासमोर उभ्या आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी नॉट रिचेबल

माथाडी कामगारांचा संप अनेक दिवस सुरू होता. संपाविषयी चर्चा करण्यासाठी व तोडगा काढण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी अनेकजण संपर्क करीत होते; मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी नॉट रिचेबल झाल्याने रेशनिंग दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संप तातडीने मिटला नसता तर जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा रेशनिंग दुकानदार संघटनेने दिला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT