Agriculture Development: देशात आकांक्षित म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्याने प्रशासनाचा पुढाकार आणि नागरिकांच्या सहकार्यातून जलसंधारणाच्या क्षेत्रात एक अद्वितीय उदाहरण साकारले आहे. जिल्ह्याने केवळ हजार-दोन हजार खड्डे नव्हे, तर ४० दिवसांत ४० हजार जलतारा (शोषखड्डे) खोदून विक्रम नोंदविला..देशात आकांक्षित म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्याने प्रशासनाचा पुढाकार आणि नागरिकांच्या सहकार्यातून जलसंधारणाच्या क्षेत्रात अद्वितीय उदाहरण साकारले. मावळलेल्या वर्षात जिल्ह्यात उन्हाळ्यात शोषखड्डे (जलतारा) खोदण्याची मोहीम राबविण्यात आली. यात लोकसहभागातून जिल्ह्याने ४० दिवसांत ४० हजार जलतारा खोदून विक्रम नोंदविला. या खड्ड्यांत एकाच वर्षात हजार कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी साचवल्याचा अंदाज आहे..Water Management: लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट.तत्कालीन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वात या मोहिमेची अंमलबजावणी झाली. प्रशासनाने मोहिमेला संपूर्ण पाठबळ दिले. बुवनेश्वरी यांनी स्वतः अनेक ठिकाणी श्रमदान केले. प्रमुख यंत्रणा अशा पद्धतीने मोहीम पुढे नेत असताना साहजिकच इतर अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनाही प्रोत्साहन मिळाले..त्यामुळे एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने जलसंधारणाच्या या प्रकल्पात अभूतपूर्व यश मिळवले. या शोषखड्ड्यांत एका पावसाच्या हंगामात प्रति खड्डा किमान ३ लाख ते कमाल ४ लाख लिटर पाणी साठवले जाऊ शकते, असा दावा केला जातो. ४० हजार खड्ड्यांत प्रति खड्डा तीन लाख लिटर पाणी गृहीत धरले, तरी सुमारे १२०० कोटी लिटर पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जिरवले गेले..वाशीम जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत पाण्याचा उपसा झाल्याने पातळी सतत कमी होत आहे. मोठे जलसंधारण प्रकल्प नसल्यामुळे सिंचनाच्या मर्यादाही स्पष्ट झालेल्या आहेत. अशा स्थितीत शोषखड्ड्यांचा प्रयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, या विचारातून ही मोहीम साकारली गेली. नागरिकांनी हे खड्डे करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. स्वतःच्या जमिनीत ५ फूट (रुंद) बाय ५ फूट (लांब) बाय ६ फूट (खोल) असे खड्डे खोदले..Water Conservation: मोखाड्यात जलसमृद्धीचा ध्यास.मोहिमेनंतर भूजल सर्वेक्षण विभागाने जुलै २०२५ मध्ये काही प्रायोगिक ठिकाणी पाहणी करीत नोंदी घेतल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीचा दीड महिना तेव्हा झाला होता. इतक्या कमी कालावधीतच मंगरुळपीर तालुक्यातील दाभाडी या गावात खड्डे खोदलेल्या शेतातील विहिरींची पातळी वाढल्याचे आढळून आले. शेतीसाठी प्रामुख्याने उन्हाळी हंगामात सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या राहते. अशा परिस्थितीत वाशीमची शोषखड्डे मोहीम प्रेरणादायी मॉडेल ठरली. जलसंधारणाच्या या प्रयोगातून पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. यापुढे दरवर्षी हा एक-एक खड्डा लाखो लिटर पाणी पिणार आहे. हे सर्व पाणी तहानलेल्या जमिनीची निश्चितच भूक भागवेल!.जिल्ह्याची भौगोलिक रचनाया जिल्ह्याचा मध्यभाग हा सपाट असून, जिल्ह्याचा भूभाग डेक्कन बेसाल्ट या खडकाने व्याप्त आहे. अजिंठा पर्वताचा काही भाग मालेगाव तालुक्यात आहे. दक्षिणेला पैनगंगा नदी वाहत पुढे गोदावरीला मिळते. समुद्र सपाटीपासून या जिल्ह्याची उंची ३३५ ते ५६७ मीटर दरम्यान आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण ७८९ मिलिमीटर पाऊस पडतो. बहुतांश क्षेत्र हे रन-ऑफ झोन (वाहक क्षेत्र) मानले जाते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास अतिशय कमी वाव आहे. अशा स्थितीत हा प्रयत्न फलदायी ठरला..या वर्षी मी शेतात जलतारा खोदली. हे शेत दरवर्षी अतिपावसात चिखलते. शिवाय खाली सहा ते सात फुटांवर खडक असल्याने पाणी निचरा व्हायला अडचणी येतात. पण खडकापर्यंत खड्ड्याची खोली ठेवली. यामुळे यात पावसाचे पाणी मुरले. जमीन चिखलण्यापासून वाचली. विहिरीचीही पाणीपातळी टिकून आहे. अनेकांच्या विहिरींची पातळी १८ ते २० फुटांवर आली आहे. या जलतारांचा फायदा आगामी एप्रिल-मेमधील पाणी पातळीला निश्चित होईल, असे दिसते. तेव्हा याच्या फायद्याचे मोजमाप करता येईल. विजय राऊत, शेतकरी, नागी, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.