Independence Day  Agrowon
ॲग्रो विशेष

Independence Day 2023 : प्रजासत्ताक सोहळ्यासाठी दहा शेतकऱ्यांची निवड

Farmers In Independence Day : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतकऱ्यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

 गोपाल हागे

Akola News : नवी दिल्ली येथे शुक्रवारी (ता.२६) होत असलेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातील १० शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून राज्यातर्फे निवडण्यात आले आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतकऱ्यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील १० शेतकऱ्यांना (सपत्नीक) उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे शेतकरी २४ ते २६ जानेवारी या काळात सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

निवडलेले शेतकरी असे...

यात अमरावती विभागातून येऊलखेड येथील अमोल भास्करराव पुंडकर (ता. शेगाव, जि. बुलडाणा), दिलीप काळे (मोहाडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय अशोक जाधव (काथापूर, ता. आंबेगाव, जि. पुणे), दीपक गुरगुडे (बाभूळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे),

चंद्रकांत सोळुंके (चिमनापूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर), काकासाहेब चाथे (चाथा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), बापूराव श्रावण बडगुजर (पाचोरा, जि. जळगाव), अमोल गणेश पाटील (केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव), बापू गजेंद्र नहाने (देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि श्रीकांत गोविंदराव भिसे (एकुरका, ता. कळंब, जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT