Natural Agriculture Abhiyan : पुणे जिल्ह्यातील २१० गावांत नैसर्गिक शेती अभियान

Dr. Panjabrao Deshmukh Natural Agriculture Abhiyan : पुणे जिल्ह्यात ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान’ २१० गावांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत ६ हजार ७५६ शेतकरी या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत.
Natural Farming
Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान’ २१० गावांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत ६ हजार ७५६ शेतकरी या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. तर ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्राची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.

विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. रासायनिक खतांचा अतिवापर, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतीच्या अयोग्य पद्धती, गाई-म्हशींचे घटते प्रमाण आणि शेणखताचा कमी वापर आदींमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे कृषी तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

Natural Farming
Maha IT : महाआयटी’ला मिळेना कर्जमाफीचा तपशील

शेत जमिनींमध्ये सर्वसाधारणपणे ०.४० टक्केपेक्षा कमी सेंद्रिय कर्ब आढळून आले आहे. रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खालावलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती अभियानाची घोषणा राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आली.

या अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्याला यंदासाठी १६० शेतकरी गट व ८ हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट आहे. महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ७५६ शेतकऱ्यांपैकी ५९४ महिला शेतकऱ्यांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे.

Natural Farming
Cotton Market : कापूस विकावा की साठवून ठेवावा?

अभियानाची उदिष्टे :

रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे

रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे

नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मूल्यसाखळी विकसित करणे

शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे

समूह संकल्पनेव्दारे उत्पादक गटांची स्थापना करणे

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणे

अभियानाची जिल्ह्यातील स्थिती

तालुका शेतकरी गटसंख्या नोंदवलेले क्षेत्र (हेक्टर )

भोर ९ ४५०

वेल्हा ७ ३५०

मुळशी १० ५००

मावळ १२ ५००

हवेली २० ५००

खेड १८ ५००

आंबेगाव १० ५००

जुन्नर १४ ६५०

शिरूर १५ ५००

बारामती १३ ६५०

इंदापूर २३ १,०००

दौंड ५ २५०

पुरंदर ९ ४५०

सध्या सेंद्रिय शेतीमालाला शहरी बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत आहे. हे अभियान सेंद्रिय शेतीमालाचे अधिकाधिक उत्पादन व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येत आहे. बाजारात असणारी सेंद्रिय शेतीमालाची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी हे अभियान आर्थिक उत्पादन वाढविणारे ठरेल.
सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती
या अभियानाद्वारे सातबाराधारक महिला शेतकऱ्यांना कृषी विभाग व ‘आत्मा’कडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. अधिकाधिक महिला शेतकऱ्यांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावे
गणेश जाधव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा बारामती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com