Agriculture Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Seeds Sale : नगर जिल्ह्यात खरिपासाठी ६० हजार क्विंटल बियाण्यांची विक्री

Agriculture Department : कृषी विभागाने यंदा ८३ हजार ५९७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. त्यातील ८० हजार ४०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले अजून असून साठ हजार क्विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झालेली आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा खरिपात सात लाख दोन हजार हेक्टरवर पेरणी, कापूस लागवडीचा अंदाज असल्याचे गृहित धरून कृषी विभागाने यंदा ८३ हजार ५९७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. त्यातील ८० हजार ४०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले अजून असून साठ हजार क्विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झालेली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख १ हजार ४७४ सरासरी क्षेत्र आहे. गेल्या तीन वर्षांतील खरीप पेरणी स्थिती पाहता यंदा ७ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड होण्याचा कृषी विभागाने अंदाज गृहीत धरून बियाणे, खताची मागणी केलेली आहे. २०२१ मध्ये ५२ हजार ६८९ क्विंटल, २०२२ मध्ये ४९ हजार ७५५ आणि २०२३ मध्ये (गतवर्षी) ५९ हजार ३२० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. या तीन वर्षांतील पुरवठा आणि विक्री आणि पेरणी पाहून यंदा बियाण्यांची मागणी केली आहे. मागील वर्षी पावसाने बराच ताण देऊनही ५ लाख ८६ हजार ३५८ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली होती.

यंदा दर वर्षीच्या तुलनेत पावसाचे लवकर आगमन झाले आहे. शिवाय चांगला पाऊस झाल्याने कापूस लागवड, पेरणीला लवकर सुरुवात झाली आहे. लवकर पाऊस झाला तर मूग आणि उडदाचे क्षेत्र तुलनेने अधिक होते असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा पावसाची अशीच स्थिती राहिली तर पेरणी, कापूस लागवड चांगली होईल.

यंदा ८३ हजार ५९७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. त्यातील ८० हजार ४०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले अजून असून साठ हजार क्विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झालेली आहे. उपलब्ध अभियानाची तुलना करता सोयाबीन बियाण्यांची कमी प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून येत आहे. उडदाच्या बियाण्यांच्या मागणीपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध होऊन विक्रीही दुप्पट झाली असल्याचे दिसून येत आहे.

बियाणे विक्री (कंसात मागणी क्विंटलमध्ये)

भात ३,४४७ (५,१८४)

बाजरी २,२४६ (३,९००)

मका ८,५६८(१३,०५०)

तूर २,०९३ (४,८५१)

मूग ९६३ (१,१५५)

उडीद ७,०३७ (२,८८७),

सोयाबीन ३२,१४२(४९,८७५)

कापूस २,२३० (२,६९५)

(सहा लाख पाकिटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT