Agriculture Update : कळंब तालुक्यातील सात गावांत सोयाबीन बियाणे उगवलेच नाही

Farmer Issue : काही गावांतून बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत असून कळंब तालुक्यातील सात गावातील पंधरा शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन बियाणे उगवले नाही.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी वेगाने पेरण्या उरकल्या. मात्र जिल्ह्यातील काही गावांतून बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत असून कळंब तालुक्यातील सात गावातील पंधरा शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन बियाणे उगवले नाही.

यात सर्वाधिक महाबीज ६१२ या वाणाचे सोयाबीन बियाणे असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळी आली आहे. दरम्यान, कृषी विभागाने बियाण्यांची उगवण न झालेल्या शेतीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.

Agriculture
Agriculture Sector Income : कृषी क्षेत्राच्या उत्पन्नात १.९ टक्के वाढ अपेक्षित

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर, उडीद, मूग, तीळ या पिकांनंतर सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली आहे. यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे केल्या आहेत.

कळंब तालुक्यातील बोरगांव (धनेश्‍वरी), हिंगणगाव, आवाड शिरपुरा, डिकसळ, आडसुळवाडी, तांदूळवाडी, लोहटा (पश्‍चिम) या गावातील पंधरा शेतकऱ्यांनी महाबीज ६१२ वाणाचे सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

Agriculture
Soybean Rate: सोयाबीन उत्पादकांना झटका

आतापर्यंत करंजकल्ला, बोरगांव धनेश्‍वरी, आवाड शिरपुरा, हिंगणगाव, डिकसळ आदी शेतकऱ्यांचे पंचनामे उपविभागीय अधिकारी शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. गुडूप, ‘महाबीज’चे अधिकारी आर. एम. माने, पंचायत समिती कृषी अधिकारी मोहन बंडगर व कर्मचाऱ्यांनी केले असून, उर्वरित पंचनामे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेळेवर पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मागील काही वर्षात दुबार पेरणी करावी लागली. आता बियाणे उगवल्यामुळे हे संकट आले आहे. शेतकऱ्यांनी दोन ते दहा एकरवर महाबीजच्या सोयाबीनची पेरणी केली आहे. मशागत व पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये खर्च वाया गेला आहे. हा खर्च देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com