Seed Sale : अनधिकृत बियाणे विक्रीचा प्रकार उघड

Bogus Seed : तेलंगणातील एका कपाशी बियाणे उत्पादक कंपनीच्या बियाणे पाकिटाची अनाधिकृत विक्रीचा प्रकार गंगापुरात उघड झाला आहे.
Seed
Seed Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : तेलंगणातील एका कपाशी बियाणे उत्पादक कंपनीच्या बियाणे पाकिटाची अनाधिकृत विक्रीचा प्रकार गंगापुरात उघड झाला आहे. कंपनी पाकिटाची हुबेहूब नक्कल करून बियाणे विक्री केल्याचा संशय असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गंगापूर पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी अजय गवळी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. 6) तीन वाजता लासूर नाका गंगापूर येथील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स गंगापूर या दुकानासमोर संशयित बोगस व अनधिकृत कपाशी बियाणे पुरवठा व विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील बियाणे निरीक्षक तथा तंत्र अधिकारी गुण नियंत्रण आशिष काळुसे यांना मिळाली होती.

Seed
Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

त्या माहितीच्या आधारे श्री. गवळी, श्री. काळुसे व सीड वर्क्स इंटरनॅशनल प्रा. लि. गोडावली मेडचाल मलकाजगिरी तेलंगणा या कपाशी बियाणे उत्पादक कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक (विक्री) अरुण नवनाथ कोळसे संबंधित ठिकाणी पोहोचले. तिथे डमी ग्राहकाला पाठविले असता बोगस व अनधिकृत कापूस बियाण्याची दोन पाकिटे विक्री करत असताना एकाला पंचासमक्ष पकडण्यात आले. त्या कपाशी बियाणे पाकिटाची पाहणी केली असता कंपनी प्रतिनिधी श्री. कोळसे यांनी ती पाकिटे त्यांच्या कंपनीची नसून बोगस असल्याचे सर्व समक्ष सांगितले.

त्यावरून ती बियाणे पाकिटे विक्री करणाऱ्या आकाश सुकासे मु. पो. संजरपूर ता. गंगापूर याची चौकशी केली असता त्याने ती पाकिटे गंगापूर शहरातील मे. सद्‍गुरू ॲग्रो ॲड मशिनरी या भूषण पाटील यांच्या दुकानातून आणल्याचे सांगितले. त्या दुकानात जाऊन चौकशी केली असता भूषण पाटील व आकाश सुकासे या दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पुढील शोध कामी पोलिसांना पाचारण केले असता दोघांनीही बाजूच्या पाटील इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्या दुकानांमध्ये कापूस बियाणे पाकिटे ठेवल्याचे कबूल केले.

Seed
Bogus Seed : काटोल, नरखेडमध्ये बोगस बियाण्यांचे जाळे

त्या दुकानाची झडती घेतली असता एका गोणीमध्ये संशयित ३० पाकिटे बोगस व अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे आढळून आले. कंपनी प्रतिनिधी श्री. कोळसे यांनी ती पाकिटे त्यांच्या कंपनीची नसून अनधिकृत असल्याचे सांगितले. पोलिसांनी पुढील चौकशी केली असता आकाश सुकासे यांनी लासूर स्टेशन येथील मे. अंबिका कृषी सेवा केंद्र येथून पवन सोपान बोरकर यांच्याकडून ती पाकीट आणल्याचे कबूल केले.

या प्रकरणात प्राप्त तक्रारीवरून आकाश सुकासे, भूषण पाटील, विशाल पाठे, पवन बोरकर या चौघांविरुद्ध गंगापूर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पाकिटातील बियाणे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, सर्वांगाने चौकशी सुरू असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

या कारवाईत कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, कृषी अधिकारी श्रीकृष्ण बंडगर, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय, मोहीम अधिकारी आर. ए. पाटील, प्रवीण सरकलवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी अजय गवळी, रविकरण दीक्षित, विजय अधापुरे, सुदर्शन ममीडवार हे सहभागी होते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com