Plateau Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Plateau Conservation : सडे, पठारे संवर्धनातून समृद्धीकडे वाटचाल : सातपुते

Junnar Tourism : जुन्नर तालुक्याला लाभलेली वैविध्यपूर्ण नैसर्गिक संपदा, त्यातूनच आपला भविष्यकाळ संवर्धनातून समृद्धीकडे न्यायचा आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्याला लाभलेली वैविध्यपूर्ण नैसर्गिक संपदा, त्यातूनच आपला भविष्यकाळ संवर्धनातून समृद्धीकडे न्यायचा आहे. यासाठी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि समृद्ध असलेल्या सडे पठारांचे संवर्धन आराखडा होत आहे, असे प्रतिपादन जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले.

वन विभागाच्या पुढाकाराने आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान पर्यावरण संवर्धनातून समृद्ध करण्याच्या संकल्पनेतून सडे, पठारे संवर्धन आराखडा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पश्‍चिम घाटातील पेसा ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना प्रकल्प आराखड्याची माहिती देण्यासाठी आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सडे, पठार संवर्धनासाठी बैठक नुकतीच श्री. सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीला तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, पंचायत समितीचे कृषी अधिकारी बुधवंत, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी, जैवविविधता संवर्धक आणि अभ्यासक डॉ. संजय रहांगडाले यांच्यासह सुमारे ५० सरपंच ग्रामसेवक या वेळी उपस्थित होते.

सातपुते यांनी सौर कुंपण योजनेची माहिती देत ७५ टक्के अनुदानावर योजना आहे. ही योजना वैयक्तिक आणि गटासाठी असून, या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT