Plateau Conservation Plan : जुन्नरच्या सडे, पठारांचा संवर्धन आराखडा करणार

Junnar Tourism : जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील सडे, पठारांचा संवर्धन आराखडा वन, पर्यटन, आदिवासी आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
Plateau Conservation
Plateau Conservation Agrowon
Published on
Updated on

Pune News : जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील सडे, पठारांचा संवर्धन आराखडा वन, पर्यटन, आदिवासी आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कला संस्कृती आणि पर्यावरणाच्या संवर्धनातून शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे, अशी माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.

जुन्नर पर्यटन समग्र विकास आराखडाअंतर्गत पश्‍चिम घाट परिसरातील हिवरे पठार, सुकाळवेढे, आंबे हातवीज या परिसरातील पठारे अतिसंवेदनशील जैवविविधतेचा ठेवा असून, या पठारांची पाहणी उपवनसंरक्षक सातपुते यांनी केली. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, जैवविविधता संशोधक आणि संवर्धक प्रा. डॉ. संजय रहांगडले, वरसुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता गवारी, चिमा जावळे, वनाधिकारी उपस्थित होते.

Plateau Conservation
Tourism Development : सोलापूरचा २८२ कोटींचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर

याबाबत माहिती देताना सातपुते म्हणाले, की जुन्नर पर्यटन समग्र विकास आराखड्यामध्ये पश्‍चिम घाट परिसरातील विविध आदिवासी गावांचा समावेश केला आहे. हा विकास आराखडा पर्यावरणाला बाधा न होता करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जैवविविधता संशोधक आणि संवर्धक प्रा. डॉ. संजय रहांगडले यांच्यासोबत पठारांची पाहणी करून, या पठारावरील दुर्मीळ जैवविविधतेची माहिती घेतली.

Plateau Conservation
Tourism Policy : पर्यटन धोरणातून रोजगारनिर्मितीसह विविध क्षेत्रांची होणार भरभराट

यामध्ये गवत, फुले, झुडूप ही जलसंवर्धनासाठी उपयुक्त आहेत. या जैवविविधतेमुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होत आहे. अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी जुन्नर पर्यटन विकास आराखड्याच्या बैठकीत पर्यावरणाला बाधा ठरणार नाही असा विकास आराखडा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर बैठकीमध्ये अजित पवार यांनी जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश असलेल्या कास पठाराच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त केली होती.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या संकटग्रस्त यादीतील प्रजातींचा अधिवास हिवरे पठार, सुकाळवेढे आणि आंबेहातवीज हा जैवविविधतेने समृद्ध प्रदेश आहे. या पठारावरील जैवविविधता संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता संरक्षण संघटना (आययुसीन) च्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट आहेत, त्यामुळे या नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
प्रा. डॉ. संजय रहांगडले, जैवविविधता संशोधक आणि संवर्धक
मधाचे गाव आणि माथेरानच्या धर्तीवर संवर्धन करण्याचा प्रयत्न या पठारांवरील जैवविविधता संवर्धनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी मधमाशीपालनाच्या पेट्या बसविण्यात येणार आहे. दिडशे वर्षांनंतरही माथेरानचा निसर्ग जैवविविधता आणि हवामानाचे संवर्धन झाले आहे. याच धर्तीवर संवर्धन आराखडा करण्यात येणार आहे.
अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com