Mango Blossom  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Blossom Sunburn : तापमान वाढल्याने मोहराची होरपळ

Heat Wave : गेल्या काही दिवसांपासून डहाणू परिसरात तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Team Agrowon

Palghar News : गेल्या काही दिवसांपासून डहाणू परिसरात तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

चालू हंगामात मोहोर येण्याची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा चांगली झाली असतानाही आता तो करपल्याने उत्पादनात घट येईल, अशी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. मागील वर्षी आंबा उत्पादन घटल्यामुळे बागायतदारांना आर्थिक फटका बसला होता.

चालू वर्षी या गोष्टीची पुनरावृत्ती होणार काय, असा प्रश्न पडला आहे. जानेवारीपासून आंब्याच्या झाडांना मोहोराची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली होती. यंदा आंबा बागायतीतून चांगले अर्थार्जन होईल, या आशेने बागायतदारांनी कीटकनाशक फवारणी, मशागत, खत-पाणी देण्याकडे मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता; मात्र फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेचा पारा वाढल्याने मोहोर करपू लागल्याने अनेकांची झोप उडाली आहे.

हेक्टरी ३० ते ४० हजारांचा खर्च

आंबा बागायतदार विक्रांत म्हात्रे यांनी सांगितले, की यंदा मोहोर चांगला आल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीसाठी मोठी गुंतवणूक केली. फवारणी व खतपाणीसाठी कमीत कमी हेक्टरी ३० ते ४० हजारांचा खर्च केला आहे; परंतु मागील दोन-तीन दिवसांत उष्णतेचा पारा वाढल्यामुळे मोहोर करपू लागल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT