Mango Blossom
Mango BlossomAgrowon

Mango Blossom: आंब्याला यंदा अधिक मोहर

Mango Production: चांगल्या थंडीचा परिणाम तसेच वातावरण चांगले असल्याने यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात आंब्याला दर वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगला मोहर आल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
Published on

Ahilyanagar News: चांगल्या थंडीचा परिणाम तसेच वातावरण चांगले असल्याने यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात आंब्याला दर वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगला मोहर आल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा आंबा उत्पादन चांगले असेल असे दिसते आहे. मोहर चांगल्या स्थितीत असला, तरी मोहराची काळजी घेण्याबाबत कृषितज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात साधारण तीस हजार हेक्टरपेक्षा अधिक आंब्याचे क्षेत्र आहे. अलीकडच्या काळात शेतकरी आंबा लागवडीला प्राधान्य देत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवडीसाठी अनुदान घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षांचा विचार केला तर आंबा लागवडीलाच प्राधान्य दिले आहे.

Mango Blossom
Mango Farming Management : गुणवत्तापूर्ण हापूस उत्पादनासाठी काटेकोर व्यवस्थापनावर भर

त्यामुळे आंब्याचे क्षेत्र वाढत असून त्यातही केसर आंब्याची अधिक लागवड झाली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या झाडांना आता मोहर आला आहे. गेल्या वर्षी धुके, ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोहराचे नुकसान झाले होते.

त्यामुळे गतवर्षी आंबा उत्पादनावरही परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात. यंदा आंबा मोहर चांगला आला आहे. गेल्या महिनाभरापासून थंडी टिकून आहे. शिवाय धुक्याचे प्रमाण अल्प असल्याने मोहराला पोषक वातावरण आहे. अशीच स्थिती राहिली तर आंब्याचे उत्पादन यंदा चांगले असेल असे शेतकरी सांगतात.

Mango Blossom
Mango Production : श्रीवर्धनमध्ये चार हजार टन आंबा उत्‍पादन
मुरमाड हलक्या जमिनीत लागवड केलेल्या बागांना मोहर पूर्णपणे निघालेला असून भारी जमिनीतील बागा अजून मोहर अवस्थेत आहेत, त्यांना मोहर निघत आहे. हलक्या जमिनीतील ज्या बागांमध्ये मोहर पूर्णतः निघालेला आहे, अशा बागांना पाणी द्यावे. ज्या बागा भारी जमिनीत असून आता मोहर निघत आहे अशा बागांना एक हलके पाणी द्यावे, म्हणजे त्यांचा मोहर पूर्णपणे निघेल. मोहराच्या संरक्षणासाठी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे नियंत्रणाचे उपाय करावेत.
डॉ. सचिन मगर, सहायक उद्यानविद्यावेत्ता, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
या वर्षी आंबा मोहर मोठ्या प्रमाणात सर्वत्र लागला आहे. बदलत्या वातावरणामुळे कीड व बुरशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा सेटिंग होतानाचा काळ हा मोठा कसरतीचा असणार आहे. योग्य वेळी फवारण्या घ्याव्या लागणार आहेत. निसर्गाची साथ मिळाली तर या वर्षी चांगले आंबा उत्पन्न राहील व चांगले दरही मिळतील अशी आशा आहे.
विष्णुपंत सानप, आंबा उत्पादक, तरडगाव, ता. जामखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com