ज्ञानेश्वर व्ही. ताथोड, डॉ. सोनाली लोखंडेFarm Machinery: पीत उत्पादनात वेळेवर तण नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या आंतरमशागतीच्या कामांसाठी मनुष्यबळही अधिक लागते. विशेषतः रुंद ओळींत पेरल्या जाणाऱ्या ऊस, कापूस, मका, सूर्यफूल, ज्वारी यांसारख्या नगदी व दोन ओळींमधील अंतर ४० सेंमी ते ९० सेंमी किंवा त्याहून अधिक असलेल्या काही भाजीपाला पिकांमध्ये सुरुवातीच्या ४० ते ६० दिवसांमध्ये तणाची उगवण मोठ्या प्रमाणात होते. ही वाढलेली तणे पिकाशी अन्नद्रव्ये, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशासाठी तीव्र स्पर्धा करतात. त्याचा फटका उत्पादनाला बसतो. .पारंपरिक पद्धतीमध्ये मजुरांच्या साह्याने खुरपणी केली जाते. किंवा बैलचलित कोळप्याचा वापर केला जातो. ही कामे वेळखाऊ, खर्चिक आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून राहतात. अशा स्थितीमध्ये जलद आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टरचलित ‘इंटर-रो रोटरी कल्टिव्हेटर’ हे एक उत्तम कृषी अवजार ठरत आहे..Land Reclamation Machinery: शेतजमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी यंत्रसामग्री.हे रोटरी खुरपणी यंत्र केवळ तण मुळासकट उपटून नष्ट करत नाही, तर जमिनीचा २ ते ३ इंच (५० ते ७५ मिमी) वरचा थर अत्यंत मऊ आणि भुसभुशीत करते. परिणामी, जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. शिवाय मातीमध्ये हवेचे खेळते प्रमाण वाढल्याने पिकाच्या मुळांची रचना मजबूत होते. त्यांची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता सुधारते..यंत्राची रचना आणि कार्यपद्धतीया यंत्रासाठी प्रामुख्याने ३५ ते ४५ अश्वशक्ती ट्रॅक्टर आवश्यक असतो. त्याच्या ३-पॉइंट लिंकेज आणि पीटीओ शक्तीवर चालते. यंत्राचा पाया हा २००० मिमी लांबीच्या मजबूत पाइपच्या चौकटीचा बनवलेला असून, त्यावर सर्व मुख्य आणि उप-भाग बसवलेले असतात. ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टकडून मिळणारी गती मध्यवर्ती गिअरबॉक्सकडे पाठवली जाते. तिथून स्क्वेअर ट्रान्समिशन शाफ्ट आणि उच्च क्षमतेच्या रोलर साखळीद्वारे शक्ती रोटर युनिट्सपर्यंत पोहोचवली जाते..Farm Mechanization: आंतरमशागतीसाठी पॉवर विडर .या यंत्रात एकूण तीन स्वतंत्र रोटरी रो-युनिट्स दिलेली असतात; प्रत्येक युनिटमध्ये दोन फ्लॅंज आणि प्रत्येक फ्लॅंजवर सहा याप्रमाणे एकूण ३६ विशेष इंग्रजी ‘जे’ (J) आकाराचे रोटरी ब्लेड्स बसवलेले असतात. हे ब्लेड्स ३०० ते ३५० आरपीएम या वेगाने फिरून जमिनीतील तण मुळासकट छाटतात. मातीचा बारीक भुगा करतात. पिकाच्या लहान रोपांना उडणाऱ्या मातीपासून किंवा फिरणाऱ्या ब्लेडपासून इजा होऊ नये यासाठी कव्हर दिलेले असते..यंत्रामधील समायोजनया यंत्रामध्ये अत्यंत सोपे व बहुगुणी समायोजन दिलेले असल्याने वेगवेगळी पिके व त्यांच्या ओळींमधील अंतर, जमिनीचा प्रकार यानुसार आवश्यक ते बदल करता येतात. पिकाच्या दोन ओळींमधील अंतरानुसार यंत्रातील तिन्ही रोटरी युनिट्स मुख्य चौकटीवर यू-बोल्ट्स मोकळे करून ४० सेंमी ते ९० सेंमी या अंतरावर सहज सरकवून हव्या त्या ठिकाणी सेट करता येतात. .त्याचप्रमाणे, प्रत्येक रोटरी युनिटची कामाची रुंदी गरजेनुसार ३०० मिमी ते ४६० मिमी दरम्यान बदलता येते. त्यामुळे रोपांना स्पर्श न होता दोन ओळींच्या मध्ये ५० सेंमीचा तणमुक्त पट्टा तयार होतो. खुरपणीची खोली नियंत्रित करण्यासाठी यंत्राच्या दोन्ही बाजूंना स्क्रू आणि स्प्रिंगने समायोजित करण्यायोग्य ‘डेप्थ कंट्रोल’ चाके दिलेली आहेत. जमिनीच्या कडकपणानुसार मातीत ब्लेडची खोली ५० ते ७५ मिमी (२ ते ३ इंच) तंतोतंत सेट करता येते.- ज्ञानेश्वर ताथोड,९६०४८१८२२०(कृषी शक्ती व अवजारे विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.