Drinking Water Relief: पैठण तालुक्यातील खेर्डा लघू प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा केवळ ३० टक्क्यांवर आल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३) जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे खेर्डा, नानेगाव, तांडा, दावरवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..खेर्डा लघु प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ६.४७ दलघमी असून, या प्रकल्पातून सुमारे ७१० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता..Drinking Water Relief: शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.याबाबत शेतकऱ्यांनी आमदार विलास भुमरे आणि खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे आणि उपअभियंता योगेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता अमित जठार यांनी खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची कार्यवाही केली. सध्या १५०० मिमी व्यासाच्या नलिकेतून विसर्ग सुरू आहे..Beed Water Crisis: पाणीबाणीचे सावट; १४ प्रकल्प कोरडेठाक.खेर्डा, नानेगाव, तांडा, दावरवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.- अमोल गोर्ड, माजी सरपंच तथा युवा शेतकरी, बालानगर.खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढेल आणि सिंचनालाही मोठा आधार मिळेल. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जपून व कार्यक्षमतेने वापर केल्यास अधिकाधिक क्षेत्राला त्याचा लाभ मिळू शकतो.- योगेश परदेशी, उपअभियंता.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.