
Palghar News : जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून फळबाग लागवड उपक्रम लाभदायक ठरत आहेत. या लागवडीतून स्थलांतर होण्याचा आकडा काही प्रमाणात घटला आहे. या भागात आंबा पीक हे सुमारे ९०४ हेक्टर लागवडीखाली आहे. मात्र, सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पावसासारख्या बदलत्या वातावरणामुळे उत्पन्नात घट होण्याची धास्ती आंबा बागायतदारांना लागली आहे.
तालुक्यातील वनवासी, साकुर, झाप, पिंपळशेत खरोंडा या भागात आंबा बागायती क्षेत्र वाढले आहे. मात्र डिसेंबरच्या सुरवातीपासूनच हवामान बदलाचा फटका आंबा पिकाला बसत आहे. गेल्या आठवड्यात वाढलेली थंडी अन् तापमानात झालेली मोठी घट यामुळे मोहोरावर परिणाम झाला.
सद्यःस्थितीत ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेत झालेली वाढ, पहाटेच्या वेळेचे दाट धुके याचा थेट फटका मोहोराला बसण्याची शक्यता आहे. दिवसभर कडक ऊन अन् पहाटेच्या वेळेची थंडी या बदलत्या वातावरणात मोहोराला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यावर्षी झाडांची पालवी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत पक्व झाली असून, आंब्याच्या फुटव्यात काडी तयार झाल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुगंध वेधतोय मशमाशांचे लक्ष
आंब्यांची झाडे मोहरलेली असून, मंद दरवळणारा सुगंध व मोहोर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पिवळाधमक मोहोर, त्यावर मधमाशांची वर्दळ अन् मोहक सुगंधामुळे आंबा बागा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.