Paddy Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Cultivation: पुणे जिल्ह्यातील भात लागवडी खोळंबल्या

Monsoon 2025: मे महिन्यात अचानक पूर्वमोसमी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात अनेक गावांत रान भाजणी व भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: मे महिन्यात अचानक पूर्वमोसमी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात अनेक गावांत रान भाजणी व भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे रोपांची टंचाई भासू लागली असून भात लागवडी खोळंबल्या आहेत. उसनवारीवर रोपे घेऊन भाताच्या लागवडी करत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली आहेत. त्यांची भात रोपे लागवडीयोग्य झाली असून लागवडी करत असल्याचे दिसून येत आहे. मावळ, मुळशी, भोर, राजगड, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी धूळ वाफेवर भात पेरणी केली जाते.

तर काही ठिकाणी मॉन्सून अगोदर येणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीनंतर अंदाज घेऊन पेरणी केली जाते. मात्र यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांना भात पेरणी करण्यासाठी संधीच मिळाली नाही.

जिल्ह्यात भात सरासरी ६१ हजार १०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार हेक्टरवर भात रोपे टाकण्याची कामे झाली असली तरी अनेक ठिकाणी ही कामे खोळंबली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध झालेली नसल्याने आतापर्यंत अवघ्या १२ हजार १७२ हेक्टर म्हणजेच २० टक्के भात लागवडी झाल्या आहेत. भात पट्ट्यातील तालुक्यामध्ये इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. 

सध्या पोषक हवामान असल्याने रोपांची वाढ चांगली झाली असून दोन ते तीन एकरावर लागवड केली आहे. परंतु अनेक ठिकाणी भात लागवडी उशिराने होत आहेत.
- रोहिदास लखिमले, प्रगतिशील शेतकरी, भोयरे, मावळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT