Wada News : तालुक्यातील चांबळे येथील प्रगतशील शेतकरी नरेंद्र पाटील यांनी वाडा कोलम या भाताच्या वाणाची लागवड केली आहे. या भात लागवडीची पाहणी नुकतीच दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी करून अधिक माहिती जाणून घेतली.
भातशेती तोट्याची असा समज होत असल्याने कोकण कृषी विद्यापीठ येथे संशोधन सुरू आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत विशेषतः वाडा कोलम या वाणाबद्दल सामान्य शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष लागवड केलेली आणि त्यासाठी केलेली प्रक्रिया जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची निवड केली होती. यामध्ये चांबळे येथील नरेंद्र पाटील या शेतकऱ्याची निवड करण्यात आली होती.
या क्षेत्र भेटीदरम्यान भात लागवड, त्याचा कालावधी, वेगवेगळ्या गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या वाणांची माहिती घेण्यात आली. यावेळी शेती करण्याची पद्धत आणि वाणांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
लागवड करण्यात आलेले क्षेत्र हे यांत्रिकीकरणातून केलेले असल्याने अवजारांची ही पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्षेत्रभेटीसाठी लवकरच बोलवण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले.
या भेटीदरम्यान कोकण कृषी विद्यापीठातील अधिकारी अभिषेक संखे, भावेश पाटील, नागेश संखे, तसेच शेतकरी नरेंद्र पाटील (चांबळे), कोंडू पष्टे (निचोळे), किरण पाटील (पालसई), नरेंद्र पाटील (झिडके), राहुल ठाकरे (ऐनशेत) आणि दिवेश पष्टे (विजयगड), हे उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.