Sorghum Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Crop : ज्वारी पिकाचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे

Pro. Kapil Ingle : मराठवाड्यातील ज्वारीच्या सद्यःस्थिती विषयी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी माहिती दिली.

Team Agrowon

Nanded News : मराठवाड्यातील ज्वारी या प्रमुख भरडधान्य पिकाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात दोनदिवसीय परिषदेचे आयोजन ता. १३ व १४ फेब्रुवारी करण्यात आले होते. या वेळी विविध तज्ज्ञांनी ज्वारी पिकाच्या पुनरुज्जीवनावर आपली मते मांडताना ज्वारी पीक वाढेल, त्याचा विकास होईल, असा आशावाद परिषदेच्या व्यक्त केला आहे.

ही परिषद संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि आरआरए नेटवर्क, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यातील ज्वारी हे प्रमुख भरडधान्य पीक असून, मागील काही वर्षांपासून ज्वारी पिकात घट होत आहे. पिकाचे पेरणी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.

या दोनदिवसीय परिषदेमध्ये ज्वारी पिकाच्या पुनरुज्जीवनासाठी, ज्वारीमध्ये सुधारित वाणाचा वापर, ज्वारी काढणी व प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकारणाचा वापर, भरडधान्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ज्वारीमध्ये विविध समस्या, आंतरपीक व मिश्रपिक पद्धतीचा वापर, प्रक्रिया उद्योग चालना व आहारातील समावेश वाढ आदी विविध विषयावर चर्चासत्र केली गेली. तर दुसऱ्या दिवशी प्रक्षेत्र भेट आणि निवडक ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व अफार्म, पुणेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी सर्वांच्या समन्वयातून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून भरडधान्य क्षेत्र वाढ व प्रक्रिया उद्योगात चालना द्यावे, असे सूचित केले. मराठवाड्यातील ज्वारीच्या सद्यःस्थिती विषयी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी माहिती दिली.

डॉ. परशुराम पत्रोलटी, प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्थेअंतर्गत ज्वारी संशोधन केंद्र, सोलापूर यांनी ज्वारीचा धान्यासाठीच वापर न करता त्याचा वापर विविध अंगांनी (हुरडा, चारा, पापड, पॉपकॉर्न, इथेनॉल निर्मिती) करावा. व भविष्यातील भरडधान्य कार्यक्रमासाठी केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्था हैदराबाद, सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले. कृषी शास्त्रज्ञ डॉ. खजीर बेग यांनी महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या ज्वारीच्या वाणाविषयी माहिती देऊन त्याची उपयुक्तता सांगितली. त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या डॉ. प्रीतम भुतडा यांनी ज्वारीच्या उपयुक्तता यावर भर देताना ज्वारीच्या वाणांवर आपले मत मांडले.

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेडचे डॉ. सतीश कारंडे यांनी आपल्या मनोगतात राज्यातील हवामान बदलाचा विचार मांडला. ‘ॲग्रोवन’ डिजिटलचे धनंजय सानप यांनी ज्वारी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. तेलंगणा राज्यातील मिलेट मिशन पुरस्काराचे विजेते वीरशेट्टी पाटील यांनी भरड धान्याचे महत्त्व विशद करून त्यापासून विविध पदार्थ निर्मितीबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी भरडधान्य लागवड व प्रक्रिया या विषयी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी नाबार्ड व इतर बँकाची मदत घ्यावी, असे सूचित केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले, व स्वागत समन्वयक व्यंकट शिंदे, डॉ. कृष्णा अंभुरे व आर. आर. नेटवर्कचे महाराष्ट्र समन्वयक सजल कुलकर्णी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT