Revival of sorghum crop : ज्वारी पिकाचे पुनरुज्जीवन महत्वाचे; सगरोळी परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केला आशावाद

Cereal crops : मराठवाड्यातील ज्वारी या प्रमुख भरडधान्य पिकाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध तज्ज्ञांनी ज्वारी पिकाच्या पुनरुज्जीवनावर आपली मते मांडताना ज्वारी पिक वाढेल, त्याचा विकास होईल, असा आशावाद परिषदेच्या पहिल्या दिवशी व्यक्त केला आहे.
Revival of sorghum crop
Revival of sorghum cropAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाड्यातील ज्वारी या प्रमुख भरडधान्य पिकाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध तज्ज्ञांनी ज्वारी पिकाच्या पुनरुज्जीवनावर आपली मते मांडताना ज्वारी पिक वाढेल, त्याचा विकास होईल, असा आशावाद परिषदेच्या पहिल्या दिवशी व्यक्त केला आहे. ही परिषद संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि आर.आर.ए नेटवर्क, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील ज्वारी हे प्रमुख भरडधान्य पीक असून मागील काही वर्षापासून ज्वारी पिकात घट होत आहे. पिकाचे पेरणी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्याच अनुषंगाने मराठवाड्यातील ज्वारी पिकाचे पुनरुज्जीवन या विषयावर १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान परिषद आयोजित करण्यात आली होती.

Revival of sorghum crop
Jowar Harvesting : ज्वारी काढणीसाठी मजूर मिळेना!

तसेच या दोन दिवसीय परिषदेमध्ये ज्वारी पिकाच्या पुनर्जीवनासाठी, शेतकऱ्यांमार्फत पेरणीचे प्रक्षेत्र वाढ, प्रक्रिया उद्योग चालना व आहारातील समावेश वाढवण्याच्या दृष्टीने विविध विषयावर चर्चासत्र केली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी प्रक्षेत्र भेट आणि निवडक ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे.

यादरम्यान आज परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध तज्ज्ञांनी आपली मते येथे मांडली. यावेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेडचे डॉ. सतीश कारंडे यांनी आपल्या मनोगतात, राज्यातील हवामान बदलाचा विचार मांडला. तसेच त्यांनी, यावेळी निसर्ग चक्रात झालेल्या बदलाचा पावसाच्या ऋतूमानावर झालेल्या बदल सांगितला. तसेच या बदलामुळे मराठवाड्यातील ज्वारी पिकाच्या पेरणीवर परिणाम झाला असून त्याचा हंगाम बदल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे डॉ. एस एन सोलंकी यांनी या चर्चा सत्रात भाग घेत आपले मत मांडले. त्यांनी, ज्वारी पिकाच्या पेरणीपासून काढणी पर्यंत तंत्रज्ञानाची कशी मदत घेता येईल. त्यासाठी यंत्रे तयार केली जात असल्याचे सांगितले.

Revival of sorghum crop
Jowar Harvesting : दुष्काळात तेरावा महिना ; ज्वारी काढणीला मजूर मिळेना

त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या डॉ. प्रीतम भुतडा यांनी, ज्वारीच्या उपयुक्तता यावर भर देताना ज्वारीच्या वाणांवर आपले मत मांडले. तेलंगणा राज्यातील मिलेट मिशन पुरस्काराचे विजेते वीरशेट्टी पाटील यांनी, भरड धान्याचे महत्व विषद केले आहे. त्यांनी भरड धान्यांना पुढील पाच वर्षात याला चांगले दिवस येतील असे म्हटले आहे.

या दोन दिवसीय परिषदेसाठी विविध संस्थांमधील तज्ज्ञ मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. यात प्रामुख्याने डॉ. परशुराम पत्रोलटी, प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय तृणधान्य संशोधन संस्था अंतर्गत ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर, संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व अफार्म, पुणे चेअरमन प्रमोद देशमुख, आर आर ए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी-नांदेड भाऊसाहेब बर्हाटे यांच्यासह ॲग्रोवन डिजिटलचे धनंजय सानप यांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com