Sorghum Crop : दुष्काळी पट्ट्यात ज्वारीची वाढ खुंटली

Rabi Season : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात १ लाख ४७ हजार ९७८ हेक्टरवर पेरा झाला आहे. सध्या हरभरा, मका व गहू पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.
Sorghum
SorghumAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात १ लाख ४७ हजार ९७८ हेक्टरवर पेरा झाला आहे. सध्या हरभरा, मका व गहू पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. बदलत्या वातावरणाचा परिमाण ज्वारी, मका आणि हरभरा पिकावर झाला असून या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच दुष्काळी पट्ट्यात पाण्याची टंचाई असल्याने ज्वारीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ९७८ हेक्टर म्हणजे ७७ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ज्वारी जत तालुक्यात केली जाते. जत तालुक्यासह अन्य तालुक्यांतील ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारीची १० हजार ६९३ हेक्टरवर पेरणी झाली.

Sorghum
Sorghum Crop : नांदुऱ्याची ओळख आता बनतेय ‘रब्बीसाठी ज्वारी बेल्ट’

दरम्यान, आडसाली ऊस लागवडीचा हंगाम संपला असून आता पूर्वहंगामी लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. सुरू हंगामातील ऊसलागवड करण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत. जिल्ह्यात ८१ हजार ८६६ हेक्टरवर उसलागवड झाली आहे.

ज्वारीची वाढ चांगली झाली असून पीक पोटरी ते फुलोरावस्थेत आहे. मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यात जिरायत ज्वारीची वाढ खुंटली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागातील ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

Sorghum
Sorghum Crop : ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापुरातच पीक घटलं, यंदा ज्वारीला भाव चांगला

गहू, हरभरा आणि मका पिकाची पेरणी सुरू असून पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू पिकावर रोगाचा प्रादुर्भाव नसून पीक वाढीच्या स्थितीत आहे. तर हरभरा पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची नोंद कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात करण्यात आली आहे.

ऊसलागवड दृष्टीक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)

आडसाली ३७,१९८.७

पूर्वहंगामी १२,८९८.६

सुरू ३८५

खोडवा २६,६३२

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज १७,८४२.९

जत ६४,९४३.४

खानापूर ६,०१६

वाळवा ७,७७५

तासगाव ६,९४१.५

शिराळा २,४६८

आटपाडी १२,८०३

कवठेमहांकाळ १७,६६३

पलूस ४,४९१

कडेगाव ७,०३५

एकूण १,४७,९७८.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com