Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १ हजार ४७२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

Kharif Season : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील यंदाच्या (२०२३) खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. परभणी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी ४७.६८ पैसे, तर हिंगोली जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४९.२० आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील यंदाच्या (२०२३) खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. परभणी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी ४७.६८ पैसे, तर हिंगोली जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४९.२० आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व ८३२ व हिंगोली जिल्ह्यातील ६४० असे एकूण १ हजार ४७२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील ५८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ८३२ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ५६ हजार ९५६ हेक्टर आहे. या गावातील यंदाचे (२०२३) पेरणीक्षेत्र ५ लाख १९ हजार ३१४ हेक्टर, तर एकूण पडीक क्षेत्र ३७ हजार ६४१ हेक्टर आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ४६ ते ४८.९० च्या दरम्यान आहे. ३० सप्टेंबर रोजी जाहीर केलेली जिल्ह्याची हंगामी (नजरी) पैसेवारी सरासरी ५२.९२ आली होती. हिंगोली जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ७०७ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ४ लाख १८ हजार २५२ हेक्टर आहे.

या गावातील यंदाचे (२०२३) पेरणीक्षेत्र ३ लाख ८२ हजार ६०९ हेक्टवर आहे. तर एकूण पडिक क्षेत्र ३५ हजार ६७७ हेक्टर आहे. जिल्ह्यातम खरीप पैसेवारी लागू असलेल्या गावांची संख्या ६६९ व रब्बीच्या गावांची संख्या ३८ आहे.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ५ तालुक्यांची खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ४८.७७ ते ४९.५३ पैसे, तर जिल्ह्याची सरासरी ४९.२० एवढी आली आहे. जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील खरिपाच्या ६४० व रब्बीच्या ९ असे एकूण ४४९ गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी, तर ५८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा आली आहे. ता. १५ डिसेंबर रोजी खरीप पिकांची अंतिम हंगामी पैसेवारी जाहीर केल्यानंतर ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होती असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT