Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

Women Health Support: ऊसतोड मजुरांच्या अनेक प्रश्‍नांपैकी त्यांच्या उपचाराचा प्रश्‍न अधिक गंभीर आहे. विशेषतः महिलांच्या आरोग्य समस्या जटिल आहेत. यावर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने ‘आरोग्य साथी’चा इलाज शोधला आहे.
Sugarcane Workers
Sugarcane WorkersAgrowon
Published on
Updated on

दत्ता देशमुख

Beed News : ऊसतोड मजुरांच्या अनेक प्रश्‍नांपैकी त्यांच्या उपचाराचा प्रश्‍न अधिक गंभीर आहे. विशेषतः महिलांच्या आरोग्य समस्या जटिल आहेत. यावर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने ‘आरोग्य साथी’चा इलाज शोधला आहे. ऊसतोड मजुरांच्या गावात एका महिलेची आरोग्य साथी म्हणून निवड करून तिला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रथमोपचाराचे साहित्यही दिले जाणार आहे. यामुळे कारखान्यांवर मुजरांना वेळीच उपचार मिळू शकणार आहेत.

राज्यात सर्वाधिक ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा अशी बीडची ओळख आहे. ऊसतोड मजुरांच्या आकड्याबाबत संघटना, मुकादम आणि प्रशासन यांच्यात मोठा फरक आहे. मात्र, अंबाजोगाई, परळी, धारूर, केज, वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी अशा सर्वच तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगण, कर्नाटक राज्यांत देखील मजुरांचे स्थलांतर होते.

Sugarcane Workers
Sugarcane Workers Welfare: ऊस तोड कामगारांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवा: डॉ. नीलम गोऱ्हे

त्यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची देखील स्थापना झाली आहे. तसेच मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना असल्या तरी त्यांच्या जनजागृती व अंमलबजावणीबाबत उदासीनता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी ‘आरोग्य साथी’ ही संकल्पना आणली असून त्यावर प्रशासनाने काम सुरू केले आहे.

जिल्ह्यातील साधारण साडेतीनशेहून गावांतून ऊसतोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर होते. या गावांतून स्थलांतरित होणाऱ्या मजूर महिलांना औषधांची नावे वाचता यावीत अशा किमान सातवी शिक्षण झालेल्या महिलेची आरोग्य साथी म्हणून निवड केली जात आहे. २० ते ३० मजुरांमागे एक आरोग्य साथी असेल. अशा १४०० आरोग्य साथींची निवड केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात या साथीला तज्ज्ञांकडून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Sugarcane Workers
Sugarcane Workers : निरक्षर ऊसतोड कामगारांना मिळणार शिक्षणाचे धडे; साखर आयुक्तांचे आदेश

मजुरांच्या गावांत नेमणार १४०० ‘आरोग्य साथी’

प्रथमोपचाराचे किट आणि प्रशिक्षण देणार

कारखान्यांवरही उपचाराचे नियोजन

ऊस तोड कामगार व विशेषत: महिला मजुरांची कारखान्यांवर उपचारासाठी परवड होते. ‘आरोग्य साथीं’च्या माध्यमातून त्यांना कारखान्यांवर प्रथमोपचार मिळाल्यास मोठा दिलासा मिळेल.
जितीन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
आरोग्य साथींना किरकोळ मलमपट्टी करण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाईल. किमान सर्दी, खोकला, ताप, जखम, अंगदुखी अशा आजारांवरील उपचाराची परवड नक्कीच थांबेल.
डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com