
Monsoon Agriculture Tips: महाराष्ट्रावर आज (ता.१०) उत्तरेस १००४ हेप्टापास्कल व मध्यावर १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. तसेच उद्या (ता.११) हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे हलक्या पावसाची शक्यता राहील. मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००२ हेप्टापास्कल व मध्यावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल. बुधवारी (ता.१३) महाराष्ट्रावर हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके राहतील.
त्या वेळी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. गुरुवार (ता.१४)पासून पुढे हवेच्या दाबात अल्प वाढ होईल आणि पावसाचे हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. या आठवड्यात मंगळवार (ता.१२)पासून पुढे बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात ढग जमा होऊन चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत १ जून ते ६ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. या कालावधीत सातारा जिल्ह्यात २६ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ४१ टक्के, लातूर जिल्ह्यात २८ टक्के, नांदेड जिल्ह्यात २२ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्यात ३४ टक्के, बीड जिल्ह्यात ४८ टक्के, जालना जिल्ह्यात ३० टक्के, हिंगोली जिल्ह्यात ४१ टक्के, वाशीम जिल्ह्यात २१ टक्के, अकोला जिल्ह्यात २८ टक्के, अमरावती जिल्ह्यात ३१ टक्के, जळगाव जिल्ह्यात २८ टक्के, धुळे जिल्ह्यात १८ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात १० टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १४ टक्के इतका सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
या वर्षी जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात २२ जुलै रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तसेच परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. हे सर्व हवामान बदलाने घडले आहे.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरुजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १६ अंश सेल्सिअस व इक्वॅडोरजवळ २१ अंश सेल्सिअस इतके कमी असल्याने तेथील हवेचे दाब वाढलेले आहेत. त्यामुळे या बाजूचे वारे तिकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता राहील.
कोकण
आज (ता.१०) सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ ते २६ मि.मी., तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत १० ते १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी २ कि.मी. आणि ठाणे जिल्ह्यात ताशी ११ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. रायगड व पालघर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यांत ८३ ते ८८ टक्के, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ९६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ८५ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.१०) नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४ ते ५ मिमी, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ताशी ११ कि.मी.,
तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ताशी १३ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील.
मराठवाडा
आज (ता.१०) धाराशिव व बीड जिल्ह्यांत १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर व नांदेड जिल्ह्यात आज ७ मि.मी., तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात कमी राहील. मात्र बंगालचे उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी (ता.१२) तयार होईल आणि ते आठवडाअखेरपर्यंत टिकेल. त्यामुळे मराठवाड्याचे पूर्व भागातील सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस होण्याची शक्यता राहील.
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी., तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत ताशी ११ किमी राहील. धाराशिव, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज (ता.१०) बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी., अमरावती जिल्ह्यात ५ मि.मी. व वाशीम जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज (ता.१०) वर्धा जिल्ह्यात ५ मि.मी., यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ताशी ३ कि.मी. तर यवतमाळ जिल्ह्यात ताशी ६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६१ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज (ता.१०) भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत १२ मि.मी., तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ५ कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ८९ टक्के, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ९१ ते ९४ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६७ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता.१०) अहिल्यानगर जिल्ह्यात ५ मि.मी., सातारा जिल्ह्यात ६ मि.मी., कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत १० मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ११ मि.मी. आणि पुणे जिल्ह्यात १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याची ताशी वेग कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ताशी ७ कि.मी., तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ताशी ११ कि.मी. आणि पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी ९ ते १० कि.मी. राहील.
कमाल तापमान पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के राहील.
कृषी सल्ला
कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीच्या सर्व्हेक्षणासाठी फेरोमेन सापळे लावावेत.
हळद पिकामध्ये कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे.
आंबा पिकास नियमित फळधारणेसाठी कलमाच्या आकारमानानुसार पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा कलमाभोवती चर खोदून द्यावी.
अचानक झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
जनावरांना लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.