Kharip Season : राज्यावर खरिपानंतर रबी हंगामाचे संकट, ३२ हजार हेक्टर वाया जाण्याची भिती

Crisis of Rabi Season : पश्चिम महाराष्ट्रासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील रब्बी हंगामापुढे टंचाईचे संकट आहे.
Kharip Season
Kharip Seasonagrowon

Maharashtra Rabi Season : राज्यातील खरिप हंगामानंतर आता रब्बी हंगामावर पावसाचे सावट ओढावले आहे. राज्यात सरासरी ५३ लाख ९७ हजार हेक्टरपैकी ३ लाख १४ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सध्या ६ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या असल्या तर उत्तर अन् पश्चिम महाराष्ट्रासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील रब्बी हंगामापुढे टंचाईचे संकट आहे.

दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील एक हजार, पुणे विभागातील १ लाख ८० हजार, कोल्हापूर विभागातील ९१ हजार, छत्रपती संभाजीनगरमधील ३२ हजार हेक्टरवर रबी हंगाम धोक्यात आला आहे. अल् निनोमुळे राज्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर राज्यातील काही तालुके दुष्काळाच्या छायेत गेले आहेत.

राज्यात गतवर्षीपेक्षा जवळपास ३५ टक्के पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा ८८.४ टक्के पाऊस झाला होता तर गेल्यावर्षी १२१.४ टक्के पावसाची नोंद झाली होती. ५० ते ७५ टक्के पावसाच्या ११ जिल्ह्यातील ११२ तालुक्यांचा १०० टक्के पावसाच्या १६ जिल्ह्यातील १४६ तालुक्यांचा समावेश आहे. १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेल्या ठाणे, रायगड, पालघर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश आहे.

३ तालुक्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. ५० ते ७५ टक्के (पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील ३१५ टँकरमध्ये २२८ टँकर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.

Kharip Season
Drought Situation : या १५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा समावेश?

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात सुरू असलेल्या टँकरची संख्या दर्शवते) नाशिक- १०६-२४२ (९९), धुळे-१-० (१), जळगाव- १३० (१४), पुणे-१०-६१ (१२), सातारा-५८-२६८ (६१), सांगली- २९-२४९ (३३), सोलापूर- ५-५२ (८), छत्रपती संभाजीनगर ५५-२ (५९), जालना १६-१३ (२८).

रब्बी हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे राज्यात सुरू आहेत. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागात ज्वारी, हरभरा, मक्याची पेरणी सुरू झाली आहे. नाशिक विभागात ज्वारी, हरभऱ्याची पेरणी काही अंशी सुरु झाली आहे. नाशिक विभागात ५ लाख ८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.

पुणे विभागात ११ लाख ४९ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असून ज्वारी, गहू, हरभरा ही पिके संरक्षित पाण्याच्या क्षेत्रात उगवण अवस्थेत आहेत. कोल्हापूर विभागात गळीताला जाणारा ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर विभागात पेरण्या शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com