Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Rehabilitation of Families: ‘‘अकोल्यातील म्हाळुंगे, सोंगाळवाडी गावांसह राज्यातील दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.९) दिली.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ‘‘अकोल्यातील म्हाळुंगे, सोंगाळवाडी गावांसह राज्यातील दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.९) दिली.

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार काम करत आहे. समाजाच्या मुख्यप्रवाहात आदिवासी आले पाहिजेत, सशक्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला असून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
Masala Village Rehabilitation : मसाळा गावाचे अखेर पुनर्वसन होणार

अकोले (जि. अहिल्यानगर) येथे शनिवारी (ता. ९) जागतिक आदिवासी दिन व शेतकरी मेळावा झाला. या वेळी आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde
Rehabilitation Villages : दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन रखडलेलेच

या वेळी मेळाव्यात बोलताना श्री. शिंदे म्हणाले, की आदिवासीचे आरक्षण जाणार असे खोटे निरेटिव्ह पसरवले गेले, मात्र तसे काही होणार नाही. ते कायम अबाधित राहणार आहे. तुमच्या ताटातील आरक्षण कोणालाही द्यायचे नाही ही सरकारची भूमिका आहे. अकोल्यात राया ठाकर व राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी दिला जाईल.

मी उपमुख्यमंत्री आहेच, पण शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे. त्यामुळे कोणाचाही त्रास, अडचण होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा शब्द सरकार पाळणार आहे. जे शब्द दिले ते टप्प्याटप्प्याने पाळNS जातील, अशी ग्वाहीदेखील श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com