Rabbi Season 2023 : दक्षिण सोलापुरात खरीप वाया; रब्बी पेरणी खोळंबली

Rabbi Farming : पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता मायबाप सरकार अडचणीतील बळिराजाला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon
Published on
Updated on

Solapur News : दुष्काळाच्या ट्रिगर-एकमधील दक्षिण सोलापूर तालुका ट्रिगर-दोनमध्ये वगळण्यात आला. परंतु, तालुक्यातील रब्बीच्या ४२ हजार हेक्टरपैकी केवळ १४ हजार ७२० हेक्टरवरच पेरणी होऊ शकलेली आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता मायबाप सरकार अडचणीतील बळिराजाला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरुणराजाच्या कृपेने खरिपातून काहीतरी हाती लागेल आणि दिवाळी आनंदात होईल, असे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला पावसाअभावी नुकसान सोसावे लागले. त्यानंतर परतीचा तरी चांगला पाऊस होईल आणि रब्बी पिकांची पेरणी करता येईल, या आशेवरील बळिराजाचा पुन्हा एकदा पावसाने अपेक्षाभंग केला, अशी वस्तुस्थिती दक्षिण सोलापूरसह सर्वच तालुक्यात आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रब्बीच्या जिल्ह्यात आता खरीप पिकांची लागवड वाढली आहे. दरवर्षी जिल्ह्यात २५ ते ३५ हजार हेक्टरवर उसाची लागवड वाढते. परंतु, यंदा पावसाअभावी उसाची लागवड घटली आहे. संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन अनेकजण जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस राखून ठेवत आहेत.

 
Rabbi Season
Sugar Production : ब्राझीलमधील साखर उत्पादनात वाढ सुरूच

दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा १२०० हेक्टरवर उसाची लागवड होईल, असा अंदाज होता. परंतु, पाऊस नसल्याने केवळ ४०० हेक्टरवर नवीन उसाची लागवड झाली. तालुक्याची पाणीपातळी ०.७३ मीटरने खालावली आहे. नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

 
Rabbi Season
Bedana Market : बेदाणा सौदे सावळीला हलविण्यास व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचा विरोध

...अशी आहे ‘रब्बी’ची स्थिती

रब्बीचे एकूण क्षेत्र ४१,७४४ हेक्टर

सध्या प्रत्यक्ष पेरणी १४,७२० हेक्टर

ज्वारीचे क्षेत्र २४,४६७ हेक्टर

प्रत्यक्षातील पेरणी १३,१०५ हेक्टर

तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि आता रब्बीची पेरणीही खोळंबली आहे. जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना भरपाई व दुष्काळी सवलती निश्चितपणे मिळतील. सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. सरकार सकारात्मक निर्णय घेईल.
- सुभाष देशमुख, आमदार
चुकीच्या आणेवारीमुळे तालुक्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. जे तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत, तेथे दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सकारात्मक निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतील.
- दिलीप माने, माजी आमदार
दक्षिण सोलापूर तालुक्यात जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची सद्य:स्थिती व संभाव्य टंचाई, खरिपातील नुकसान व रब्बीची पेरणी अशा सर्व बाबींचा वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित विभागाकडून मागविला आहे. दुष्काळजन्य स्थिती तालुक्यात आहे.अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाईल.
- किरण जमदाडे, तहसीलदार,दक्षिण सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com