Gram Vikas Bhawan, CIDCO Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue Meeting : दुष्काळाचे दुष्टचक्र भेदण्याचा संकल्प

Water Update : पाणी प्रश्नावर ग्रामविकास भवन, सिडको येथे झालेल्या बैठकीतून नदीजोड प्रकल्पाला गती देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाचे दुष्टचक्र भेदण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा संकल्प मराठवाडा पाणी परिषदेच्या मंथन बैठकीत करण्यात आला. रविवारी (ता. १९)पाणी प्रश्नावर ग्रामविकास भवन, सिडको येथे झालेल्या बैठकीतून नदीजोड प्रकल्पाला गती देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली.

बैठकीच्या सुरवातीला आयोजना मागची भूमिका मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी स्पष्ट केले. श्री शिवपुरे म्हणाले, की दुष्काळी मराठवाड्यासाठी पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या नदी जोड प्रकल्पास २०१९ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र आजपर्यंत ओंजळभरही पाणी मराठवाड्याला मिळाले नाही.

नदी जोड प्रकल्पाला गती देऊन मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी अल्प व दीर्घकालीन कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करावा. अल्पकालीन स्थितीमध्ये मिशन मोडवर जलसंधारण व धरणातील गाळ काढणे कामे, शाश्वत व प्रभावी सिंचनाकरिता पाणी वापर संस्थांची मोठ्या प्रमाणात स्थापना व सक्षमीकरण, अपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, कालवा दुरुस्ती व मनुष्यबळ उपलब्धता, पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापराकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी कामे व्हावी.

तर दीर्घकालीनमध्ये नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरीत पाणी वळविणे, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळविणे. ही कामे झाली पाहिजे. याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा व आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचे अभिवचन द्यावे.

यावेळी आधार जलदूत समितीचे अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे, प्रेरणा फाउंडेशनचे भाऊसाहेब मते, माजी अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग डॉ. जयसिंग हिरे, गट शेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी अनुक्रमे शाश्वत व प्रभावी सिंचनाकरिता पाणी वापर संस्था, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना मराठवाड्यासाठी वरदान,

मराठवाडा सिंचन अनुशेष निवारणाकरिता कृती कार्यक्रम, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना पैठण, पाण्याच्या कार्यक्षम वापराद्वारे कृषी उत्पादकतेत व उत्पन्नात वाढ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थिता पैकी अनेक मान्यवरांनी दुष्काळ मुक्त मराठवाडा कालबद्ध कार्यक्रमासाठी अनेक मौलिक सूचना केल्या.

अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. सर्जेराव ठोंबरे म्हणाले,की दुसरा सिंचन आयोग व वेळोवेळीच्या अनुशेष निवारण समित्याने मराठवाडा सिंचन अनुशेष निवारणाकरिता सुस्पष्ट अशा सूचना केलेल्या आहेत.

याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याची गरज आहे. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर सरोदे, दिनेश पारिक, रामचंद्र पिल्दे, कैलास तवार, भास्कर उघडे, रवींद्र बोडके, योगिता तौर, संतोष एरंडे, डॉ. बाबासाहेब गोजरे, माऊली मुळे, भरत थोटे, कृष्णा पाटील, अरुण सोनवणे, प्रा. शिवाजी हुसे, आपचे वैजिनाथ राठोड व विश्वनाथ दहे यांच्यासह मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी व युवक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शेवटी बाजीराव ढाकणे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT