Buldana News: जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. नियमित कर्मचाऱ्यांचे मात्र नियमितपणे पगार होतात. अनियमिततेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक हाल अत्यंत वाढले आहेत. शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिल्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सर्वच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे..मागील सहा महिन्यांपासून प्रवर्गानुसार घटकानिहाय मानधन अदा केले जात असून, त्यामुळे महिन्याला नियमित वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी संभाजीनगर प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश असतानाही शासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. यासंदर्भात ३ डिसेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीसाठी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे बोलावूनही बैठक न घेणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे. या योजनेतील नियमित कर्मचाऱ्यांचे नियमित पगार होतात. .Gram panchayat workers Protest : ग्रामपंचायत कामगार आषाढी वारी दिवशी करणार भीक मांगो आंदोलन.परंतु, कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र प्रशासकीय खर्चाच्या प्रमाणात मानधन दिले जाईल, अशी अट घालून मानधन अदायगीसाठी राज्यस्तरावरून टाळाटाळ करण्यात येत आहे. यामध्ये सध्या राज्यस्तरावरून नियुक्त एजन्सीच वेळेत काम करून देत नसल्यामुळे खर्च होत नाही आणि या कारणास्तव कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन अडवले जात आहे. यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये राज्यस्तरीय यंत्रणेबाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून त्यांनी ठोस पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे..Contract Employees Appointment: उत्पन्न आणि काम नसतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती .कृती समितीच्या आवाहनानुसार ५ डिसेंबरपासून राज्य शासनाच्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपमधून कर्मचारी बाहेर पडले. दोन दिवसांत मानधन न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. सोमवार (ता. ८)पासून.काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल. यानंतरही मानधन न मिळाल्यास पुढील आठवड्यात असहकार आंदोलन व पूर्ण काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृती समितीने दिलेल्या निवेदनावर जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत..पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा इंग्रजांच्या जुलमी धोरणासमान आहे. अशा अन्यायी आणि असंवेदनशील वृत्तीला कंटाळूनच आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेलो आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला मानधन न देता उपासमारीच्या उंबरठ्यावर आणणारे हे जुलमी शासन व प्रशासन यांची उदासीनता आणखी एक किती काळ सहन करायची? आमच्या न्याय्य हक्कासाठी, जगण्याच्या लढ्यासाठी आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही.- रमाकांत गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समिती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.