Flood Control Committee : जलसंपदा विभागाचा धरणात पाणी साठवणे एवढाच उद्योग, महापूर निंयत्रण कृती समितीची नाराजी

Kolhapur Flood : कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आदी नद्यांचा महापूर रोखण्यासाठी या नदीकाठावरील लोकांनीच जागृत राहण्याच्या सूचना समितीकडून देण्यात आल्या.
Flood Control Committee
Flood Control Committeeagrowon

Flood Control Action Committee : कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आदी नद्यांचा महापूर रोखण्यासाठी या नदीकाठावरील लोकांनीच जागृत राहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या कुरुंदवाड येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन गट नियोजनासाठी बैठक झाली. डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पूर नियंत्रण आणि जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनावर कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आदी नद्यांचा महापूर रोखण्यासाठी या नदीकाठावरील लोकांनीच जागृत राहिले पाहिजे. तसेच केंद्रीय जल आयोगाने धरणातील पाण्याचे व्यवस्थापन व नियमनासाठी तत्त्वे, जे निकष व नियम निश्चित केलेत. त्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आग्रही राहिले पाहिजे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांना लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. असल्याचे सांगण्यात आले.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, अभियंता विजयकुमार दिवाण, अभियंता प्रभाकर केंगार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जलसंपदा विभागाला केंद्रीय जल आयोगानेच धरणांच्या जलव्यवस्थापनाचे व नियमनाचे काही निकष व नियमांची जाणीव करून देण्याचा उद्देश कृती समितीचा असल्याचे बोलले जात आहे.

सन २०१८ मध्येच हे निकष निश्चित केले आहेत. मात्र अधिकाऱ्यांना ते माहीत नव्हते. दोन वर्षे त्याची माहिती देऊनही नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. धरणात पाणी साठवणे एवढाच उद्योग जलसंपदा विभाग करत आहे. पाऊस पडणार नाही, या अनाठायी भीतीपोटी आजवर अनावश्यक वेळी धरणे भरून ठेवली जातात.

Flood Control Committee
Kolhapur Flood Survey : महापुरात सर्वाधिक बाधित होणाऱ्या तालुक्यालाच वगळलं, जागतिक बँकेने काय पाहणी केली?

वस्तुतः शंभर वर्षांत सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी ठराविक पाऊस खात्रीने पडला. पाऊस पडणार नाही व धरण भरणार नाही, ही भीतीच निरर्थक आहे. त्यातून महापुराचे संकट ओढवत आहे, ते लक्षात आणून दिले जाण्यासाठी महापूर बचाव कृती समिती आतापासूनच काम करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

जल आयोगाचे निकष

पावसाळा सुरू होताच धरण भरून ठेवण्याची घाई नको.

१ जूनला धरणात साठवण क्षमतेच्या दहा टक्केच पाणी शिल्लक ठेवले पाहिजे.

३१ जुलैला धरणात ५५ टक्केच साठा ठेवला पाहिजे.

३१ ऑगस्टला धरणातील पाणी क्षमतेच्या ७७ टक्के हवे.

१५ सप्टेंबरला धरण किती भरायचे याचा निर्णय घ्यावा.

३१ जुलै रोजी 'अलमट्टी'ची पाणीपातळी ५१५.५० मीटरहून अधिक नको.

जुलैचा उत्तरार्ध व ऑगस्टच्या पूर्वार्धात पाऊस वाढला तरच महापूर येतो हे लक्षात घेऊन नियोजन करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com