Water Issue : उमटेतील साठवण क्षमता निम्‍मी

Water Scarcity : उमटे धरणातील गाळ ४६ वर्षांपासून काढलेला नाही. यामुळे ८७ दशलक्ष घनफूट असलेली धरणाची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफुटावर आली असून तालुक्यातील ४७ गावे व ३३ वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
Umte Dam
Umte DamAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : तालुक्यातील उमटे धरणातील गाळ ४६ वर्षांपासून काढलेला नाही. यामुळे ८७ दशलक्ष घनफूट असलेली धरणाची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफुटावर आली असून तालुक्यातील ४७ गावे व ३३ वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या विरोधात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता. १४) मोर्चा काढल्यावर, जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे.

उमटे धरणातील गाळ काढण्याचे काम त्‍वरित सुरू करावे याशिवाय बंधाऱ्याची डागडुजी करावी, यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे.

Umte Dam
Water Demand : वाकुर्डे योजनेच्या पाण्यासाठी आज शेतकऱ्यांसमवेत सत्याग्रह

धरण गाळाने भरल्‍याने नागरिकांना डिसेंबरपासूनच पाणी कपातीला सामोरे जावे लागते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. धरणातील गाळ काढून नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, त्‍याकडे वर्षोनुवर्षे दुर्लक्ष होत असल्‍याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्‍या पत्रात, उमटेतील गाळ काढण्यासाठी तत्काळ निधी द्यावा, पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर धरणावर अवलंबून ४७ गावे आणि ३३ वाड्यांतील नागरिक आंदोलन करतील, असा इशारा उमटे धरण संघर्ष समितीने दिला.

Umte Dam
Pune water scarcity : पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! धरणांमध्ये फक्त २३ टक्केच पाणीसाठा

धरणाबाबत आढावा

धरणाची निर्मिती १९७८

रायगड जिल्हा परिषदेकडे हस्तांतर १९९५

साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट

पाण्याची अंतिम पातळी ४० मीटर

धरणाची उंची ५६.४० मीटर

सद्यस्थितीत साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट

धरणातून होणारा पाणीपुरवठा ४७ गावे व ३३ आदिवासी वाड्या

उमटे धरणाबाबत प्रशासकीय स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. दोन दिवसांत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. गाळ काढण्याबरोबरच बंधारा, पंप हाऊसची डागडुजी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार असून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com