Beed News: शेतातील काडीकचरा, पालापाचोळ्याचे कंपोस्ट रूपांतर शेतातच करणे फायदेशीर ठरते. जमीन आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांनी सतत ज्ञान संपादन केले पाहिजे, असे मत तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी केले..दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या माध्यमातून ‘जागतिक मृदा दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे माजी सरपंच युवराज पिसुरे यांनी भूषविले प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारती ग्रीन टेकचे विनय पोळ, कृभाको कंपनीचे विपणन अधिकारी श्रीकृष्ण चेके, कृषी निविष्ठा व्यापारी संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष विकास मिरगणे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक पिकविद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी केले..Compost Fertilizer : काडीकचरा, पाचट, धसकटापासून बनवा उत्तम प्रतीच कंपोस्ट खत.या वर्षीचा मृदा दिन ‘निरोगी शहरांसाठी निरोगी माती’ या आशयाने साजरा होत असून, माती संवर्धनाची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री चेके म्हणाले, की शेतकऱ्यांनी वापरलेला युरिया केवळ अल्प प्रमाणातच पिकांना उपलब्ध होतो..Stubble Burning : शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळाल तर दंड भराल.श्री. पोळ यांनी मातीची सध्याची स्थिती व तिच्या बिघडत्या आरोग्याची कारणे स्पष्ट केली. निसर्गातील कुजविणे-पचविणे या सर्व प्रक्रिया जिवाणूंच्याच माध्यमातून घडतात, त्यामुळे जिवाणू खते वापरणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. .पुढच्या पिढीसाठी निरोगी जमीन ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. डॉ. वसंत देशमुख म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शेती पद्धती, नैसर्गिक शेती, जैविक खतांचा वापर यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांमध्ये मृदा आरोग्य संवर्धनाची जागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. .पिकांना आवश्यक असलेली विविध जिवाणू खते कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध असल्याचे त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.