Chilli  Agrowon
ॲग्रो विशेष

Red Chilli : लाल मिरचीच्या दरात घट

Chilli Market : सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारात ४०० ते ५०० रुपये किलो झाले होते.

Team Agrowon

Vashi News : उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यंदा दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारात ४०० ते ५०० रुपये किलो झाले होते.

मात्र, किलोमागे आता हे दर ५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात लाल मिरचीचा ठसका उतरणीला लागला आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात सध्या लाल मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरच्यांची आवक वाढली आहे. सध्या १४ ते १५ गाड्या मिरच्यांची दररोज घाऊक बाजारात आवक होत आहे.

हळूहळू या गाड्यांची संख्या वाढू लागली आहे. मुख्य हंगामात ८० ते ९० गाड्या दाखल होतात. एका गाडीत चार ते पाच हजार गोणी मिरच्या असतात. मिरच्यांच्या गोणीचे वजन ३० ते ३५ किलो असते. फेब्रुवारी ते मार्च हा बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना असतो. त्यामुळे या काळात बाजारात लाल मिरच्यांचा ठसका लागतो.

अवकाळी पावसामुळे नुकसान

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. त्यातच अनेक ठिकाणी गोदामात असलेली लाल मिरचीही पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून बाजारात लाल मिरचीचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती.

या महिन्यात आवक वाढल्याने मिरचीचे दर कमी होत आहेत. घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची घट झाली आहे. घाऊकमध्ये दर उतरल्याने किरकोळ बाजारातही दर उतरणीला लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

OTS Scheme : सातारा जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा: तब्बल ५,५७८ शेतकरी ‘ओटीएस’ योजनेसाठी पात्र!

Farm Of The Future : कृषी क्षेत्रात मोठी क्रांती: ब्राह्मणीत साकारणार आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘फार्म ऑफ द फ्युचर’!

Land Investment : विकासाचा महामार्ग: 'बायपास'नजीक शेतजमिनींच्या दरांना सोन्याचा भाव; गुंतवणूकदारांची मोठी गर्दी!

Sugar Mills Maharashtra: गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटली; उपाययोजना सूचविण्यासाठी समिती स्थापन

Guava Market : सोलापूर बाजार समितीत पेरूचा गोडवा; दररोज तब्बल एक हजार क्रेटची विक्रमी आवक!

SCROLL FOR NEXT