Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट

Onion Crop : यंदा सव्वा ते दीड लाखाच्या आसपास क्षेत्रावरच उन्हाळ कांद्याची लागवड होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की.

Team Agrowon

 Nashik News : कांदा हे प्रमुख नगदी पीक असणाऱ्या कसमादेसह चांदवड, येवला, नांदगाव भागात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात उच्चांकी दोन लाख २० हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ (रब्बी) कांद्याची लागवड झाली होती. परंतु यंदा सव्वा ते दीड लाखाच्या आसपास क्षेत्रावरच उन्हाळ कांद्याची लागवड होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की.

कांदा उत्पादक क्षेत्रात पावसाळी म्हणजे पोळ कांदा, लेट खरीप कांदा व उन्हाळी (रब्बी) कांदा असे तिन्ही प्रकारचे कांदा पीक येथे घेतले जाते. पण कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी कांद्यालाच जास्त पसंती देतात. यावर्षीच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची तर होरपळ झालीच शिवाय पावसाच्या वक्रदृष्टीमुळे नद्या-नाले, धरणे-तलाव कोरडेठाक आहेत.

त्यामुळे रब्बी हंगाम घेणे अशक्य आहे. अशी सर्व परिस्थिती असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात मोठी घट होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्यासाठी रोपवाटिका अर्थात उळे टाकले जात आहे. गिरणा, मोसम, आरम या नदी काठावरील शेतकरी तसेच पाट कॅनॉलचे लाभधारक व असेच काही थोडेफार शेतकरी उळे टाकत आहेत. तर इतर शेतकऱ्यांनी लेट खरीप कांदा घेणे पसंत केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT