onions planting
onions plantingAgrowon

Onion planting : खानदेशात तीन हजार हेक्टरवर कांदा लागवड

Onion Cultivation season : खानदेशातील अनेक जिल्ह्यांमध्य कांदा लागवड सुरू आहे. लागवड सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली
Published on

Jalgaon News : खानदेशात कांदा लागवड सुरू आहे. लागवड सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली असून, शनिवारी (ता. १९) व रविवारी (ता. २०) पाऊस झाल्याने लागवडीस आधार मिळाला आहे. पाऊस कमी आहे. पण अशा स्थितीतही कांदा लागवड काही शेतकऱ्यांनी उरकली. लागवड सुमारे साडेसहा ते सात हजार हेक्टरवर अपेक्षित आहे.

onions planting
Onion Export : कांदा निर्यात शुल्काविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलनात

रविवारी सकाळी व दुपारीदेखील अनेक शेतकऱ्यांनी लागवड करून घेतली आहे. हलक्या, मध्यम जमिनीत चांगला वाफसा शेतकरी कायम ठेवत आहेत. कांदा लागवड कमी पावसाने रखडत सुरू आहे. कारण भीज पाऊस असल्यास लागवड वेगात केली जाते. शेतकऱ्यांना ऑगस्टमध्ये श्रावणात चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा होती.

कांदा लागवड शनिवारी व रविवारी खानदेशात अनेक शेतकऱ्यांनी उरकली. सुमारे क्षेत्र तीन हजार हेक्टरवर पोचले आहे. यंदा लेट खरिपातील लागवडही होईल. कारण परतीच्या पावसावरही अनेकांनी कांडा लागवडीचे नियोजन केले आहे. यातच कांदा लागवड या आठवड्यात वाढणार आहे. कारण अनेकांच्या रोपवाटिकांतील रोपे ५० दिवसांची झाली आहेत. पावसाची उघडीप राहिल्यास शेतकरी तुषार, ठिबक सिंचनाच्या मदतीने क्षेत्र भिजवून घेतील व येत्या तीन ते चार दिवसांतच खानदेशातील ६० टक्के क्षेत्रावर अपेक्षित लागवड पूर्ण होईल.

onions planting
Onion Procurement : रब्बी कांदा १० लाख टन साठवणूक करू; मुख्यमंत्री शिंदे

धुळे, जळगाव, नंदुरबारात लागवड सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, एरंडोल, धरणगाव या भागात लागवड सुरू आहे. धुळ्यात साक्री, शिंदखेडा व धुळे भागात लागवड सुरू आहे. शिरपुरात फारशी लागवड नाही. नंदुरबारात नंदुरबार, नवापूर भागात लागवड सुरू आहे. यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. कांदा रोपांचे दरही स्थिर आहेत.

काही भागात लागवडीनंतर शिल्लक रोपे शेतकरी इतरांना अल्प दरात किंवा उधारीवर देखील देत आहेत. एका १०० बाय अडीच फुटाच्या सरीमधील कांद्याचे रोप कमाल दोन हजार रुपयात उपलब्ध होत आहे. यापेक्षा कमी दरही आहेत. यामुळे लागवड बऱ्यापैकी होईल, अशी स्थिती आहे. काही शेतकरी मूग, उडदाचे क्षेत्र रिकामे करून त्यावर कांदा लागवडीचे नियोजन करीत आहेत. कांदा लागवडीसाठी मजूरदेखील उपलब्ध होत असून, मजुरीचे दर १५० ते २०० रुपये रोज, असे आहेत. कांदा लागवड पुढील २० ते २५ दिवस सुरू राहील, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com