Onion Cultivation : कांदा लागवड रडतखडत सुरू

Khandesh Onion Cultivation : खानदेशात धुळे जिल्ह्यात खरिपातील कांदा लागवड अधिकची केली जाते. त्यापाठोपाठ जळगावात लागवड असते. नंदुरबारातही नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यात खरिपात कांदा पीक असते.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : मागील तीन वर्षे शेतकऱ्यांना कांद्याचे कमी मिळालेले दर, अतिपाऊस व उष्णतेत झालेली हानी आणि जून व ऑगस्टमधील कमी पाऊस आदी कारणांमुळे या खरिपातील कांदा लागवड रखडत झाली आहे.

खानदेशात धुळे जिल्ह्यात खरिपातील कांदा लागवड अधिकची केली जाते. त्यापाठोपाठ जळगावात लागवड असते. नंदुरबारातही नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यात खरिपात कांदा पीक असते. परंतु यंदा जूनमध्ये कमी पाऊस होता.

तसेच जून, जुलैमध्येही कांद्याचे दर अल्प होते. यामुळे अनेकांनी लागवड टाळली. काहींनी क्षेत्र कमी करून रोपवाटिका तयार केल्या. परंतु लागवड हवी तेवढी कुठेही झालेली नाही. लागवड ऑगस्टमध्येच पूर्ण होण्याची अपेक्षा होती.

Onion Cultivation
Onion Subsidy : कांदा अनुदानातही भेदभाव? शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लवकर निर्णय घ्या अन्यथा

या काळात पाऊस कमी असल्याने लागवड रखडत झाली. सात हजार हेक्टरवर ऑगस्टमध्ये लागवड खानदेशात पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु लागवड हवी तशी झाली नाही. ऑगस्टमध्ये कांदा दरात काहीशी सुधारणा दिसली.

यानंतर अनेकांनी लेट खरिपाच्या कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिकांमधील कांदा रोपे २० ते २२ दिवसांची आहेत. ऑक्टोबरमध्ये या रोपांची लागवड होईल.

धुळ्यात सर्वाधिक खरिपातील लागवड साक्री तालुक्यात केली जाते. या पाठोपाठ धुळे, शिंदखेडा भागातही कांदा लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल या भागांत लागवड केली जाते.

लेट खरिपातील कांदा रोपवाटिका धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर भागांतही आहेत. जळगाव जिल्ह्यातही चोपडा, यावल, जळगाव, भागात लेट खरिपासंबंधी कांदा रोपवाटिका आहेत.

मागील हंगामात कांद्याची लागवड ऑगस्टमध्ये पूर्ण झाली होती. यंदा मात्र लागवड रखडत झाली आहे. पुढेही फारसे क्षेत्र वाढणार नाही. एकूण लागवड साडेसहा ते सात हजार हेक्टरपर्यंतच असू शकते, असाही अंदाज आहे.

Onion Cultivation
Onion Market: आवक कमी होऊन कांदा दबावातच का? कांद्याचे भाव वाढतील की दबावातच राहतील?

लेट खरिपासंबंधीच्या कांदा रोपवाटिका चोपडा, यावल भागात जोमात आहेत. मिनी तुषार सिंचन, ठिबकच्या मदतीने रोपवाटिका शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत. अनुकूल वातावरणामुळे वाढ बऱ्यापैकी झाली आहे. ६ ते ८ जुलैदरम्यान पाऊस झाला. याचाही लाभ या कांदा रोपवाटिकांना झाला.

लेट खरिपातील लागवड दीड हजार हेक्टरपर्यंत

लेट खरिपातील लागवड खानदेशात एक ते दीड हजार हेक्टरवर असू शकते. सध्याची लागवड सुमारे पाच हजार हेक्टरवर झाली आहे. धुळ्यातील लागवडीत मोठी घट झाली आहे. कारण पाऊस नसल्याने साक्री, धुळे भागांतील लागवड कमी झाली. यात यावल, चोपडा भागांतही लागवड घटली आहे. चाळीसगाव, धरणगाव भागांतील लागवड स्थिर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com