Onion Plant : भाऊ, दादा आम्हलेही कांदानं उळे मिळई का!

कांदा रोपे बुरशीजन्य रोगामुळे खराब होत आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी नात्यागोत्याकडे कांदा रोप (ऊळे) मिळावे म्हणून एकमेकांचा मोबाइल संदेश आता सुरू झाला आहे.
Onion Cultvation
Onion CultvationAgrowon

नरकोळ : कांदा रोपे (Onion Plant) बुरशीजन्य रोगामुळे खराब होत आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी (Summer Onion Sowing) नात्यागोत्याकडे कांदा रोप (ऊळे) मिळावे म्हणून एकमेकांचा मोबाइल संदेश आता सुरू झाला आहे. ‘आम्हणा करता कांदानं निळ उळे सांभाळी ठेवा’ हा अहिराणी संदेश सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.

Onion Cultvation
Onion Market Lasalgaon : लिलाव बंद पडल्यानंतर पुन्हा सुरळीत सुरू

यावर्षी पावसाळा दमदार झाल्यामुळे व परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे जमिनीत अति पावसामुळे बुरशी तयार झाली. त्याचा परिणाम कांदा रोपांवर झाला. शेतकऱ्यांनी दोनवेळा रोप टाकूनही बुरशीजन्य रोग पिच्छा सोडेना, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी महागडी औषध फवारणी करून रोपे वाचविण्याचा प्रयत्न केला.

काही शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. तर काहींचा खर्च वाया गेला. आता त्यांना इतर ठिकाणी रोप पाहण्याची वेळ आली आहे. यासाठी आता नात्यागोत्याची मदत घ्यावी लागत आहे. मोबाईल संदेशाद्वारे व प्रत्यक्ष भेटून रोपांची मागणी शेतकरी करीत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा रोप तयार करण्यासाठी आता आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

यावर्षी दसऱ्यापर्यंत परतीचा पाऊस झाल्याने कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. रोपे वाचविण्यासाठी प्रयत्नाची परकाष्ठा करावी लागली. वाचविलेल्या रोपातून लागवड होते की नाही, याची शाश्‍वती नाही.
- पोपट मोरे, शेतकरी, केरसाणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com