Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds Sale : तुटवडा असलेले कापूस बियाणे विक्री न करण्याचा रावेरात निर्णय

Cotton Seeds : राज्यातील माफदा या खते व बियाणे विक्रेत्यांशी संबंधित असलेल्या जिल्ह्यातील खते, कीडनाशके, बियाणे विक्रेता असोसिएशनच्या रावेर शाखेने तुटवडा असलेल्या कापूस बियाण्याची विक्री न करण्याचा निर्णय रावेरात जाहीर केला.

Team Agrowon

Jalgaon News : राज्यातील माफदा या खते व बियाणे विक्रेत्यांशी संबंधित असलेल्या जिल्ह्यातील खते, कीडनाशके, बियाणे विक्रेता असोसिएशनच्या रावेर शाखेने तुटवडा असलेल्या कापूस बियाण्याची विक्री न करण्याचा निर्णय रावेरात जाहीर केला. परंतु या निर्णयास या संघटनेच्या सर्व तालुक्यांतील घटक, शाखांनी जाहीर पाठिंबा दिलेला नाही किंवा जाहीर बैठका घेऊन आपला निर्णय जाहीर केलेला नाही.

कापूस बियाण्याची जादा दरात विक्री केल्याप्रकरणी नुकतीच म्हसावद (ता. जळगाव) येथे एका कृषी केंद्रावर कारवाई झाली आहे. शेतकऱ्यांना ८६४ रुपयांचे कापूस बियाणे पाकिट १३०० ते १५०० रुपयांत देऊन नाडवणूक सुरू आहे. कृषी केंद्रांतच हा प्रकार सुरू आहे. एचटीबीटी किंवा राज्याबाहेरून येणाऱ्या कापूस बियाण्यास खते, कीडनाशके व बियाणे विक्रेत्यांच्या असोसिएशनचा विरोध असायचा,

परंतु आता अधिकृतपणे कापूस बियाणे विक्री करतानाच अनेक कृषी केंद्रचालक, वितरक हे काळाबाजार, लुटालूट करीत आहेत. यात अनेक जण जिल्हा खते, किडनाशके, बियाणे विक्रेता असोसिएशनचे सदस्य आहेत, तर काही या असोसिएशनमध्ये तालुका किंवा अन्य स्तरावर पदाधिकारीदेखील आहेत. बाहेरच्या बियाण्यास कडाडून विरोध करायचा, होळी करायची आणि आपणच अधिकृतपणे आलेले कापूस बियाणे जादा दरात शेतकऱ्यांना देऊन लूट करायची,

असा प्रकार अनेक कृषी केंद्रचालक, वितरक जिल्ह्यात करीत असून, त्यास विविध स्तरांवर कृषी विभागाची देखील फूस किंवा बळ आहे, अशीही कुजबूज सुरू आहे. कारण जिल्ह्यात कृषी केंद्र, वितरकांच्या स्तरावर कापूस बियाण्याचा काळाबाजार, लूट सुरू असताना जुजबी कारवाई कृषी विभाग करीत आहे, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

रावेरात विरोध, अन्यत्र पाठिंबा का नाही

जिल्ह्यात काही कंपन्यांच्या कापूस बियाण्याची मोठी कृत्रीम टंचाई करून खिसे भरण्याचे काम सुरू असताना रावेर खते, बियाणे विक्रेता असोसिएशनने एक बैठक घेऊन तुटवडा असलेले कापूस बियाणे विक्री न करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु रावेरात कापूस पीक अत्यल्प आहे. केळी पीक रावेरात अधिक आहे.

हा निर्णय जामनेर, जळगाव, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल आदी भागांतील खते, कीडनाशके, बियाणे विक्रेत्यांनी प्रथम घ्यायला हवा व त्याची अंमलबजावणीदेखील व्यवस्थितपणे करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण जामनेर, जळगाव, पाचोरा, अमळनेर, मुक्ताईनगर या भागात कापूस बियाण्याचा मोठा काळाबाजार सुरू आहे. याच भागात शेतकऱ्यांची मोठी लूट मागील काही दिवसांत झाल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT