Cotton Seeds Sale : जादा दराने बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा

Cotton Seeds Update : शेतकऱ्यांची अधिक मागणी असलेल्या कापसाच्या बियाणांची तिपटीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याची बाब शेतकऱ्यांनी निदर्शनात आणून दिली.
Cotton Seeds
Cotton Seeds Agrowon

Nagar News : शेतकऱ्यांची अधिक मागणी असलेल्या कापसाच्या बियाणांची तिपटीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याची बाब शेतकऱ्यांनी निदर्शनात आणून दिली. त्यानंतर नगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विभागाच्या पथकाने वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे छापा टाकून जादा दराने बियाणे विकणाऱ्या त्याच बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीकडून २२ बियाण्यांची पाकिटे जप्त करून वैजापूर पोलिस ठाण्यात बियाणे कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम व महाराष्ट्र कापूस बियाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडून कापूस बियाण्यांची खरेदी सुरू आहे. काही ठरावीक वाणांची मागणी शेतकरी करतात. नेवासा (जि. नगर) तालुक्यातील शेतकऱ्यांना एका खासगी कंपनीच्या वाणाचे कापूस बियाणे हवे होते. शेतकऱ्यांनी चौकशी केल्यावर हवे असलेले बियाणे २७०० रुपये प्रति पाकिटानुसार मिळत असल्याची माहिती मिळाली.

Cotton Seeds
Cotton Seed Supply : अकोल्यात विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा पुरवठा रोखला

बाजारात कापूस बियाण्यांच्या पाकिटाची किंमत ८६४ रुपये असताना ते २७०० रुपयांनी म्हणजे तिपटीपेक्षा अधिक रकमेने विक्री होत असल्याचे कळताच शेतकऱ्यांनी नगर जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी राहुल ढगे यांना माहिती दिली. त्यानंतर नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनखाली ढगे यांच्या पथकाने संबंधित बियाणे कोठे मिळते याबाबत माहिती घेतली.

Cotton Seeds
Cotton Seeds Sale : कपाशी बियाण्याची जादा दराने विक्री केल्यास कारवाई : सामाले

जास्ती दराने बियाणे विक्री करणारी व्यक्ती नेमके ठिकाण सांगत नव्हती. आधी गंगापूर, त्यानंतर वैजापूर असे सांगितले. अखेर शुक्रवारी (ता. २४) पहाटे तीन वाजता वैजापूर येथे नगरचे गुणनियंत्रण अधिकारी ढगे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी हरिभाऊ कातोरे, जगदीश वाघमारे, उपविभागीय अधिकारी अशोक आढाव, पी. एस. जटाळे यांच्या पथकाने संबंधित कंपनीच्या बियाणे विक्री प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर काकासाहेब काळे (मूळ रा. गोडेगाव, जि. नाशिक, सध्या छत्रपती संभाजीनगर) यांच्या घरी छापा टाकून २२ बियाणे पाकिटे, बिलबुक जप्त केले आहे.

संबंधित बियाणे कोपरगाव येथील कंपनीचे अधिकृत वितरकाकडून घेतले असल्याचे सांगत असले, तरी नगर जिल्ह्यात या बियाण्यांचा पुरवठाच झाला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोपरगाव, तसेच वैजापूर येथील तालुका कृषी अधिकारी या बाबत अधिक माहिती मिळवून तपास करत आहेत. जास्ती दराने बियाणे विक्रीचे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या बाबत जगदीश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com