Vegetable Market Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : चाकणला हिरवी मिरची, टोमॅटो दरात सुधारणा

Vegetable Rate : महात्मा फुले बाजार आवारात टोमॅटोची आवक घटल्याने दर वाढले आहेत.

Team Agrowon

Pune News : महात्मा फुले बाजार आवारात टोमॅटोची आवक घटल्याने दर वाढले आहेत. चाकण बाजारात जुन्नर, खेड आंबेगावसह सातारा तसेच नगर जिल्ह्यातून सुमारे २० टन आवक झाली. या वेळी दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलो होते. टोमॅटोचे भाव पुढील काळात शंभर रुपयापर्यंत जातील, अशी शक्यता व्यापारी, शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बहुतांश फळभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे २० टन आवक होऊन प्रतिकिलोला ५० ते ७० रुपये दर राहिले. टोमॅटोची रविवारी (ता. ७) सुमारे २० टन आवक झाली.

टोमॅटोचे भाव ५० ते ६० रुपये प्रतिकिलो राहिले. टोमॅटोच्या दरात अगदी २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. पाऊस लांबल्याने नवीन लागवडी रखडल्या आहेत. परिणामी टोमॅटोचे भाव शंभरी गाठतील, अशी शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांनी वर्तविली.

बाजारात कांद्याची सुमारे १ हजार ५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिकिलोला २० ते ३० रुपये भाव मिळाला. तर बटाट्याची सुमारे दोन हजार क्विंटल आवक झाली. त्यास प्रति किलोला सुमारे २५ ते ३० रुपये भाव मिळाला.

बटाट्याचे भाव वाढत आहेत. बटाट्याची आवक ही प्रामुख्याने इंदोर, आग्रा येथून झाली. तर लसणाची गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश येथून ३० टन आवक झाली. या वेळी लसणाला प्रतिकिलोला १०० ते १७० रुपये दर मिळाले, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT