Ahmednagar- Pune News: पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीत पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारीला होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक कोंडी व अडथळा होऊ नये, यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलिस प्रशासनाने अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात ३० तासांसाठी बदल केला आहे..पुणे जिल्ह्यातील पेरणे येथे १ जानेवारीला दरवर्षी हा कार्यकम होत असतो. यंदाही गुरुवारी (ता. १) येथे कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याचे प्रशासनाने गृहीत धरले आहे..Pune APMC Traffic Issue: पुणे बाजार समितीत दुचाकी प्रवेशावर बंदी.हा कार्यक्रम अहिल्यानगर-पुणे महामार्गालगत आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे..वाहनांचा भाविकांना धक्का लागून, अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ ते शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक, तसेच अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गामध्ये पुढीलप्रमाणे बदल होणार आहे..Traffic Issue : पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांत अनेक मार्गांवर वाहतूक बंद.बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक बेलवंडी फाटा, देव दैठण, धावलगाव, पिंपरी कोलंदर, उक्कडगाव बेलवंडी नगर- दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गमार्गे पुणेकडे..अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कायनेटिक चौक-केडगाव बायपास, अरणगाव बायपास, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गमार्गे पुणेकडे..अहिल्यानगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कल्याण बायपास, आळेफाटा, ओतूर, माळशेज घाट मार्ग असा राहील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.