Latur News: जळकोट तालुक्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्वच तलावांत समाधानकारक जलसाठा आहे. यासोबतच तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यांमध्येही पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे यंदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊसशेतीकडे कल असल्याचे चित्र आहे. कारखान्याने वेळेवर ऊस नेला तर ही शेती फायदेशीर ठरणार आहे..यंदा अनेक गावात जलसाठ्याशेजारी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार असून उसाच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार असल्याचे चित्र आहे. कारण खरिपातील विविध पिकांची ''खर्च जास्त उत्पन्न कमी'' अशी स्थिती आहे. पाणी उपलब्ध असल्यास ऊस पिक घेणे चांगले, असे शेतकरी म्हणत आहेत. जळकोट तालुक्यात जवळपास १४ साठवण तलाव आहेत. हळदवाढवणा, रावणकोळा, माळहिप्परगा, डोंगरकोणाळी, सोनवळा, हावरगा, चेरा १, चेरा २, गुत्ती १, गुत्ती २, डोंगरगाव केकतशिदगी, जंगमवाडी, चाटेवाडी या ठिकाणच्या तलावात जलसाठा बऱ्यापैकी आहे. यामुळे या साठवण तलावाच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये ऊसाच्या लागवडीकडे कल दिसत आहे..Sugarcane Season: कोल्हापुरात ऊस आंदोलनाला सुरुवात, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली.दोन वर्षांपूर्वी तालुक्यात अतिशय कमी पाऊस पडला होता. गतवर्षीच्या उन्हाळ्यात तर सर्व साठवण तलाव कोरडेठाक पडले होते. अनेक शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर मोठ्या प्रमाणामध्ये उसाची लागवड केली होती. परंतु कमी पावसामुळे जलस्रोत म्हणावे तेवढे भरले नाहीत. उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने साठवण तलावावरील मोटारीचे कनेक्शन तोडले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस लागवड बंद केली होती. यंदा, मात्र मुबलक पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर कारखान्याला जाणेही महत्त्वाचे आहे. तरच, हे पीक फायदेशीर ठरते. कारण मजुरी व इतर अडचणीमुळे गुऱ्हाळातून गूळ तयार करणे अलीकडे बंद होण्याच्या मार्गावर आहे..Sugarcane Season : आम्ही चाललो ऊस तोडणीला....कारखान्यांकडून अपेक्षासध्या तोडणीसाठी शेतकऱ्याचे लक्ष कारखान्यांकडे लागले आहे. ऊस लागवड होऊन १२ महिने पूर्ण झाले आहेत. तरीही जवळील कारखाने ऊस तोडणीसाठी यायला तयार नाहीत. म्हणून शेतकरी आता बाहेरील कारखाने म्हणजे गांधीनगर, बाऱ्हाळी कारखाना पर्याय निवडत आहेत. पण त्यांचा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. शेतकऱ्यांचा ऊस त्यांच्या इच्छेप्रमाणे जवळील कारखान्यांनी वेळेत न्यावा, अशी आमची मागणी असल्याचे शेतकरी पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले..पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागडीकडे कल आहे. तालुक्यात पूर्वहंगामी ५५९ हेक्टर, ४४९ हेक्टर सुरू तर खोडवा २४९ हेक्टर असे मिळून १२३७ हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. जानेवारी-फेब्रुवारीत हे क्षेत्र वाढणार आहे.- एस.आर. पाटील, तालुका कृषी अधिकारी, जळकोट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.