raju shetti agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Shetkari Sanghatana : हातकणंगलेसह ६ जागांवर स्वाभिमानी उमेदवार देणार : राजू शेट्टी

Ravikant Tupkar : बुलढाण्यातून रविकांत तूपकर लढत आहेत. ते आमचेच आहेत. त्यांना आमचा पाठिंबाच असेल असे शेट्टी यांनी सांगितले.

sandeep Shirguppe

Lok Sabha Election 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह सांगली, परभणी, माढा, बुलडाणा आदि जागांवर लढणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी(ता.८) पत्रकार परिषदेत दिली. कोण लढावे याबाबत त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना मोकळीक दिल्याचेही त्यांनी सांगितले.

बुलढाण्यातून रविकांत तूपकर लढत आहेत. ते आमचेच आहेत. त्यांना आमचा पाठिंबाच असेल असे श्री शेट्टी यांनी सांगितले. मी कोणावरही टीका न करता शेतकऱ्यांचे प्रश्न घेवूनच प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर मतदारसंघात श्रीमंत शाहू छत्रपती शाहू महाराज काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांचे आणि संघटेनेचे वेगळे नाते आहे. ऊस दराचे आंदोलन मिटण्यासाठी त्यांनी रस्‍त्यावर येवून मध्‍यस्ती केली होती यामुळे त्यांच्‍या पाठिंब्‍याबाबत काय करायचे हे बैठक घेवून ठरविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले की, शिवसेना (ठाकरे गट) उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करीत राहिली. अखेर मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देवू असा प्रस्ताव दिला. त्यास होकार दिला असता तर स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागला असता, पण ते शक्य नव्हते.

यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. सोयीचं राजकारण करायचे असते तर कुठल्या तरी राजकीय पक्षात गेलो असतो. आम्ही निवडणूक स्वतंत्र लढू हे २०२१ लाच ठरविले होते. यामुळे स्‍वतंत्र राहण्याचा निर्णय हा जुना आहे. आम्हाला पक्षांपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्‍वाचे आहेत.

महायुती असो अथवा महाआघाडी ज्या ज्या वेळी या पक्षांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यावेळी कोणताही विचार न करता आम्ही बाहेर पडलो. यामुळे कोणाला बळ देणे किंवा कोणाला विरोध करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले. १५ एप्रिलला बैलगाडीतून अर्ज दाखल करणार असल्याचेही श्री शेट्टी यांनी सांगितले.

ठाकरे गटावर टीका

सत्याजित पाटील यांचे वडील कारखान्याचे गेली २० वर्षे उपाध्यक्ष आहेत. साखर कारखान्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन माझ्यासारख्या शेतकरी नेत्याचा पराभव करण्याच्या हालचाली कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. सांगलीचा निर्णय वसंतदादा यांचे घराणे संपवण्यासाठी घेतला आहे की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT