Sharad Pawar : 'बोट धरून शिकलो म्हणणारेच आज भूमिका बदलत आहेत'; शरद पवार यांची मोदींवर टीका

Sharad Pawar On PM Narendra Modi : शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. पवार यांनी सोमवारी (ता.०८) बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. 
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. सोमवारी (ता.०८) बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाच्या दौऱ्यात पवार यांनी, भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी पक्षातून सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. पवार यांनी, 'मोदी यांनी बारामतीच्या सभेत आपण शरद पवार यांचे बोट धरून राजकारण शिकलो आणि गुजरातचा विकास केला', असे म्हटले होते. मात्र तेच आता आपली भूमिका बदलत आहेत. मी कृषीमंत्री असताना काय केलं असा सवाल करत आहेत?', असे म्हटले आहे. 

'मोदी यांच्या आरोपावरून आपण कृषीमंत्री असताना काय केलं हे सांगताना पवार म्हणाले, 'मी राज्यासह देशातील अनेक मंत्रीपदे भूषवली. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाचे कृषीमंत्री घेतले. जे कोणी घेत नव्हते. मी १० वर्षे हे पद हाताळले'. 'पहिल्याच दिवशी धान्य आयात करण्याची फाईल सहीसाठी आली. पण मी सही केली नाही. यावरून मनमोहन सिंग यांचा फोन आला आणि देशातील धान्य साठ्याची माहिती घेण्याची त्यांनी विनंती केली. यानंतर परिस्थीती लक्षात घेऊन परत देशात धान्य आयात करायचे नाही असे ठरवूनच सही केल्याचे', पवार म्हणाले. 

Sharad Pawar
Sharad Pawar : एमपीएससी-यूपीएससी, सारथी, बार्टी, कंत्राटी नोकर भरती अन् भ्रष्टाचारावरून शरद पवार यांचा सरकारला टोला

'मी कृषीमंत्री पद हाती घेतले त्याच दिवशी धान्य आयात करायवी लागली होती. तर कृषीमंत्री पद सोडताना आपण जगातल्या १८ देशांना अन्न धान्य निर्यात करू शकलो. आजही आपण निर्यातदार आहोत. तर १ वर्षात देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. व्याजाचे दर कमी केले. नवीन बी बियाने दिलीत. यासगळ्या गोष्टींमुळे आपला देश आज अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. याचा सर्वाधिक आनंद असल्याचे, पवार म्हणाले.  

याचबरोबर बारामतीत केव्हीके संस्था सुरू केली असून आज ती देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे. येथील काम पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. तर साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद आपल्याकडे असून आज येथे चांगल्या कामामुळे कोणत्याही डोनेशन शिवाय ४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे पवार म्हणाले.  

Sharad Pawar
Sharad Pawar : 'मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही'; शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका

'याच बाबींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी बारामतीच्या भाषणात कौतूक केले होते. ते म्हणाले होते की, मी पवार यांचे बोट धरून गुजरातमध्ये विकास केला. पण आता तेच देश विरोधी भूमिका घेत आहेत. मोदी यांच्या धोरणांवर टीका केल्यानेच आता कारवाया सुरू झाल्या आहेत असा आरोप पवार यांनी केला आहे. तसेच मोदी यांच्यावर टीका केली म्हणून आज केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. केरजीवाल यांनी दिल्लीत जे काम केले ते बाहेरचे लोक पहायला येतात. पण फक्त टीका केली म्हणून केजरीवाल यांना तुरूंगात टाकले आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे', असेही पवार यांनी म्हटले आहे. 

तर सध्या देशाची एक हाती सत्ता मोदींच्या हातात गेली असून ती आपल्याला मुक्त करायची आहे. ही निवडणूक राहुल गांधी विरूद्ध मोदी अशी असल्याचा प्रचार काही नेते करत आहेत. येथे राहुल गांधी मते मागायला येणार आहेत की मोदी हाच प्रश्न पडला आहे. तर येथे लोकांचे प्रश्न महत्वाचे असून तो कोण सोडवतो हे महत्वाचे असल्याचा टोला फडणवीस यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांना पवार यांनी लगावला आहे. 

अजित पवार यांच्यासह पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करताना पवार म्हणाले, 'भाजपमुळे काही लोकांना आता टोकाची भूमिका घ्यावी लागत आहे. यातूनच घरातील माणसाला उभे केले आहे. भाजप हा पक्ष मग्रूरांचा असून तो मुठभर लोकांचा आहे. तो सर्वसामान्यांचा नाही'. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com