Rajesh Kumar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Chief Secretary: राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार

Rajesh Kumar: ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. निवृत्त होत असलेल्या सुजाता सौनिक यांच्यानंतर ते ४९ वे मुख्य सचिव ठरले आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवारी (ता. ३०) मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.

या वेळी मंत्रालयातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी राजेश कुमार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मुख्य सचिवपदी नियुक्त झालेले राजेश कुमार ४९ वे सनदी अधिकारी आहेत.

पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. सौनिक यांच्या काळात मंत्रालयातील प्रवेशासाठी आणलेली प्रणाली विशेष चर्चेत राहिली.

सौनिक यांच्या जागी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांची नियुक्ती केली आहे. राजेश कुमार हे १९८८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. पुढील दोन महिन्यांत म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.

त्यामुळे मुख्य सचिव म्हणून काम करण्यास राजेश कुमार यांना जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने पुढील आदेश होईपर्यंत महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार यांच्याकडेच कायम ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Pest Management: उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

Indian Politics: उपराष्ट्रपतिपदासाठी सरकारची प्रतिष्ठा पणाला

Marathi Identity Politics : महाराष्ट्रधर्म आणि ‘महाराष्ट्रकारणा‘चे राजकारण

MSP Protection : शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे शक्य आहे का?

Pune APMC : ...तर पुणे बाजार समितीला लागलेले ग्रहण सुटेल

SCROLL FOR NEXT