Dr. Tukaram Mote: विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे सेवानिवृत्त

Regional Joint Director of Agriculture Retirement: कृषी विभागात ३२ वर्षे सेवा दिल्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक पदावरून डॉ. तुकाराम मोटे सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Dr. Tukaram Mote
Dr. Tukaram MoteAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी विभागात सुमारे ३२ वर्षे सेवा दिल्यानंतर कृषी विकास अधिकारी पदापासून विभागीय कृषी सहसंचालक पदापर्यंत पोहोचलेले डॉ. तुकाराम मोटे सोमवारी (ता.३१) सेवानिवृत्त झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी म्हणून डॉ. मोटे १० जून १९९३ रोजी कृषी विभागात रुजू झाले होते. तिथे तीन वर्षे सेवा दिल्यानंतर अकोला जिल्ह्यात विभागीय मृदा संधारण अधिकारी, विभागीय मृदा संधारण अधिकारी या पदावर त्यांनी १९९८ ते ९९ दरम्यान सेवा दिली.

Dr. Tukaram Mote
Dr. Ashok Dhawan: मलाही धमक्या आल्या होत्या; माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचा धक्कादायक खुलासा!

९९ ते २००५ दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी सिल्लोड, उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर या पदावर ते कार्यरत होते. २००६ ते ०७ दरम्यान हिंगोली जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, तर २००७ ते ०८ दरम्यान महाराष्ट्र राज्य पाणलोट सल्लागार समिती उपाध्यक्ष यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी सेवा दिली.

२००८ ते ०९ दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी २००९ ते १० दरम्यान नागपूर येथे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१० ते १५ दरम्यान लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून तर २०१५ ते १८ दरम्यान नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून २०१८ मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.

Dr. Tukaram Mote
Dr. Mahanand Mane: कृषिमंत्र्यांविषयी ‘घुसखोरी’ शब्दप्रयोग चुकीचाः डॉ. माने

डॉ. मोटे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडील विभागीय कृषी सहसंचालक पदाचा भार छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्याकडे सोपविला.

आज सेवापूर्ती गौरव सोहळा

सेवानिवृत्ती निमित्त डॉ. तुकाराम मोटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवारी (ता १) स्थानिक भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com