MERI Maharashtra: मेरी’च्या महासंचालकपदी अभय पाठक यांची नियुक्ती

Director General MERI: महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या महासंचालकपदी अभय पाठक यांची नियुक्ती झाली असून, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची सूत्रे राजेश सोनटक्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
MERI
MERIAgrowon
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) महासंचालकपदी अभय पाठक यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी राजेश सोनटक्के यांना बढती मिळाली आहे.

जलसंपदा क्षेत्रात देशपातळीवरील नावाजलेली संस्था म्हणून ‘मेरी’चा उल्लेख होतो. या संस्थेचे महासंचालक जलसंपदा विभागाच्या सचिव दर्जाचे आहे. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या संकल्पना तसेच प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता असे नाजूक मुद्दे ‘मेरी’कडून हाताळले जातात.

MERI
MGNREGA : मनरेगा अंतर्गत २३३ कोटी ९९ लाख रुपयांवर खर्च

महासंचालकपदावरून प्रमोद मांदाडे नुकतेच निवृत्त झाले होते. त्यामुळे तात्पुरती जबाबदारी आशिष देवगडे यांच्याकडे देण्यात आली होती. ते जलसंपदा विभागाच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे मुख्य अभियंता आहेत. मेरीचे नवे महासंचालक श्री. पाठक यापूर्वी मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या सहसचिवपदी कार्यरत होते.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी बढती मिळालेले श्री. सोनटक्के यापूर्वी अमरावती जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतापदी कार्यरत होते. तसेच, तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आता मुख्य अभियंता जयंत बोरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आधीचे कार्यकारी संचालक प्रकाश पवार निवृत्त झाल्यामुळे श्री. बोरकर यांना संधी देण्यात आली आहे.

MERI
Agriculture Department: ‘दक्षता’, ‘गुणनियंत्रण’मधील वादातून झाला खोटा पत्रव्यवहार

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पदाची तात्पुरती सूत्रे आता मुख्य अभियंता जयंत गवळी यांना देण्यात आली आहेत. ते संभाजीनगर लाभ क्षेत्र विकास यंत्रणेचे मुख्य प्रशासक आहेत. आधीचे मुख्य अभियंता विजय घोगरे निवृत्त झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जलसंपदा विभागाचे नागपूरमधील मुख्य अभियंतापद अद्याप पूर्णवेळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. यापदावरील आधीचे अभियंता प्रकाश पवार यांना पदोन्नती मिळाल्यापासून या पदाची अतिरिक्त सूत्रे भंडारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता रवीकुमार पराते यांच्याकडे देण्यात आलेली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com