Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा

Unseasonal Rain : परभणी-हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशीही मॉन्सूनोत्तर पावसाने तडाखा दिला. या दोन जिल्ह्यांतील ८१ मंडलांमध्ये बुधवारी (ता. २९) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशीही मॉन्सूनोत्तर पावसाने तडाखा दिला. या दोन जिल्ह्यांतील ८१ मंडलांमध्ये बुधवारी (ता. २९) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी १५.९ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९ मिलिमीटर पाऊस झाला.

मागील दिवसांत तीन वादळी वारे, विजांच्या कडकडात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील तूर, कपाशी, रब्बीतील ज्वारी, हरभरा आदी पिकांसह फळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरूच असल्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात दिवसागणिक भर पडत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम बाधित क्षेत्र निश्‍चित होईल.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ५१ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील मंडलांत पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.९ मिलिमीटर, तर नोव्हेंबर महिन्यात एकूण सरासरी ८५ मिलिमीटर पाऊस झाला.

तर यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ६०८.५ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील ३० मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलांत पावसाचा अधिक जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९ मिलिमीटर, तर नोव्हेंबर महिन्यात ८८.६ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ८३५.१ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय झालेला पाऊस (५ मिलिमीटरच्या पुढे)

परभणी जिल्हा : परभणी शहर २४.८, परभणी ग्रामीण १३.८, पेडगाव ६, झरी १०.३, सिंगणापूर २३.३, दैठणा २५.८, पिंगळी १५.३, जिंतूर ५.८, आडगाव बाजार ६.८, दूधगाव ९.५, कुपटा ८.८, मानवत २१.५, केकरजवळा १८.८, कोल्हा १०.३, ताडबोरगाव १७.८, रामपुरी १९.८, कासापुरी १४.५, सोनपेठ ४०.३, आवलगाव ७.३, शेळगाव २१.५, वडगाव २०, गंगाखेड २२, महातपुरी ४४.५, माखणी २३.३, राणीसावरगाव ४३.३,

पिंपळदरी ३८.३, पालम २०.५, चाटोरी ३७.८, बनवस ४६, पेठशिवणी २७, रावराजूर ४५.३, पूर्णा २३.३, ताडकळस २१.८, लिमला २७.८, कात्नेश्‍वर १२.३, चुडावा १६.५, कावलगाव १०.३. हिंगोली जिल्हा : हिंगोली ५.८, सिरसम ११, बासंबा ५, डिग्रस कऱ्हाळे ६.३, माळहिवरा ७.३, कळमनुरी ६, आखाडा बाळापूर ९.३, नांदापूर ९, डोंगरकडा १४.५, वारंगा २४.५, वसमत ११.८, आंबा १२.३, हयातनगर ११.८, गिरगाव २१.५, हट्टा १०, टेंभुर्णी १९, कुरुंदा १९.३, औंढा नागनाथ १५.३, येळेगाव ८.३, साळणा १५.३, जवळा बाजार ७.३.

परभणी जिल्ह्यात ६९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान... प्राथमिक अंदाजानुसार परभणी जिल्ह्यातील एकूण ७५ गावे अतिवृष्टी, मॉन्सूनोत्तर पावसाने बाधित झाली आहेत. ५७ जनावरे दगावली आहेत. ५३३ हेक्टर जिरायती ६६ हेक्टर बागायती, ९३ हेक्टर फळपिके असे एकूण ९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसान क्षेत्रात जिंतूर तालुक्यातील ४४८ हेक्टर, पूर्णा तालुक्यातील २४४ हेक्टरचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Death: अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या

Narendra Modi 75th Birthday: पंतप्रधान मोदींना देश-परदेशांतून शुभेच्छा

Agriculture Development: ‘शेतीमाल निर्यात सुविधा केंद्र सक्षम करा’

Tractor Sales: ट्रॅक्टर विक्रीला माॅन्सूनचा ‘बूस्ट’

Sugar Commissioner Transfer: साखर आयुक्त पदाचा संगीत खुर्चीचा खेळ

SCROLL FOR NEXT