Rain Update : चासकमान धरणक्षेत्रात ६७ मिलिमीटर पाऊस

Rain News : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस पडला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस पडला आहे. चासकमान धरणक्षेत्रात सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून एकूण १५.५१ दशलक्ष घनमीटर (०.५५ टीएमसी) एवढे पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. त्यापैकी २१ धरणांच्या क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर धरणांच्या क्षेत्रात सर्वाधिक २५ मिलिमीटर पाऊस पडला. तर पानशेत, खडकवासला, वरसगाव धरणक्षेत्रात हलका पाऊस पडला.

Rain Update
Hailstrom Crop Damage : द्राक्ष, रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा

नीरा खोऱ्यातील चासकमान धरणांच्या पाठोपाठ कळमोडी धरणांत ४५ मिलिमीटर पाऊस पडला. तर गुंजवणी ४३ मिलिमीटर, आंध्रा ३३, भामा आसखेड ३१, पवना २५, तर कासारसाई येथे २२ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Rain Update : दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

वडिवळे, भाटघर, वीर धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. नीरा-देवघर, शेटफळ, नाझरे या धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण होते.

कुकडी खोऱ्यात चांगला पाऊस

कुकडी खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला. चिल्हेवाडी धरणक्षेत्रात ४८, तर पिंपळगाव जोगे धरणक्षेत्रात ४७, डिंभे ४६, माणिकडोह ३१, येडगाव ३०, वडज २७ तर घोड ४ मिलिमीटर पाऊस पडला. मुळशी धरणक्षेत्रातही ३२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. विसापूर आणि उजनी धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com