Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : मंठा तालुक्यात रब्बीच्या पेरण्या लांबल्या

Rabi Sowing : पेरणीस उशीर झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी उडीद - मूग या पिका ऐवजी कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी मोठ्या क्षेत्रात केली.

Team Agrowon

Mantha News : तालुक्यात यावर्षी उशिरा का होईना समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे छोटे-मोठे जलसाठे पूर्ण भरले आहेत. तसेच विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पाणीसाठा उपलब्ध असल्याने रब्बीचे भरपूर उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पेरणीस उशीर झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी उडीद - मूग या पिका ऐवजी कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी मोठ्या क्षेत्रात केली.

उशिरा पेरणी झालेल्या पिकाची चांगली वाढ होऊन कापूस वेचणीला तर सोयाबीन काढणीला आले होते. परंतु सोयाबीन पीक काढणीस येत असताना अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तर आता उर्वरित सोयाबीन पिकाची सोंगणी सुरू असतानाच शनिवारी पडलेल्या पावसाने सोगंणी करून शेतात असलेल्या सोयाबीनचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चार एकर शेतात सोयाबीन पेरली होती. पिकाची चांगली वाढ झाली होती, परंतु मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतात पाणी साचून सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. आता उर्वरित शिल्लक राहिलेल्या पिकाचे शनिवारी पडलेल्या परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे.
- संभाजी अवचार, शेतकरी , विडोळी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT