Rabi Sowing : सांगोला तालुक्यात ५७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Rabi Season 2024 : सांगोला तालुक्यात रब्बीचे सरासरी ४४ हजार ४७१ हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी तालुक्यात रब्बी पिकांच्या पेरणीचे ५७ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Sangola News : सांगोला तालुक्यात रब्बीचे सरासरी ४४ हजार ४७१ हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी तालुक्यात रब्बी पिकांच्या पेरणीचे ५७ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ४२ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती.

यावर्षी रब्बी पेरणीचे सुमारे १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र वाढणार आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी सध्या पावसाची गरज आहे. पाऊस लांबल्यावर तालुक्यातील रब्बीची पेरणीही लांबणार आहे. सांगोला तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६८.३ मि.मी. असून, आजपर्यंत ४९३.८ मि.मी. म्हणजे १०५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

यावर्षी एकंदरीत पर्जन्यमान चांगले झाले आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. तालुक्यात २२ हजार ७१९ सरासरी हेक्टर क्षेत्र खरिपाचे क्षेत्र असूनसुद्धा यावर्षी ३८ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची विक्रमी १६७.४६ टक्के पेरणी झाली आहे.

यावर्षी मका पिकाची विक्रमी २१ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मकेबरोबरच बाजरी, सूर्यफूल, उडीद, तूर पिकेही जोमात आली होती. खरिपाप्रमाणे रब्बीचेही गतवर्षीपेक्षा १५ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन लाख हेक्टरवर रब्बी पिके

तालुक्याचे सरासरी रब्बी पेरणी क्षेत्र ४४ हजार ४७१ हेक्टर आहे. यामध्ये रब्बी ज्वारी ३७ हजार ४७९ हेक्टर, मका ५ हजार १५६ हेक्टर, गहू ८२२ हेक्टर, हरभरा ७६८ हेक्टर या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते. गतवर्षी रब्बी हंगामामध्ये ४२ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पेरणी कमी झाली होती. यावर्षी रब्बी हंगामामध्ये ५७ हजार १५० हेक्टर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी ३६ हजार हेक्टर, मका १५ हजार हेक्टर, गहू ३ हजार हेक्टर, हरभरा ३ हजार हेक्टर, करडई १०० हेक्टर, सूर्यफूल ५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीत साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

शेतकरी बांधवांनी चांगला पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा पाहून बीजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची पेरणी करावी. कृषी विभागामार्फत रब्बी ज्वारी पिकाचे एक हजार हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचबरोबर अनुदानावर ज्वारीचे प्रमाणित बियाणेही वाटप केले जात आहेत. खरेदी- विक्री संघ व शेतकी भवन, सांगोला येथून परमिटवर किंवा सात- बारा व आधारकार्ड देऊन अनुदानावर ज्वारी बियाणे उपलब्ध आहेत.

रब्बी हंगाम पीक पेरणी नियोजन क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पिकाचे नाव सरासरी क्षेत्र यावर्षी पेरणीचे नियोजन

ज्वारी ३७४७९ ३६०००

गहू ८२२ ३०००

मका ५१६६ १५०००

इतर तृणधान्य २२२ --

हरभरा ७६८ ३०००

एकूण ४४४७१ ५७१५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com